या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाई : महाराजांचा विजय असो. महाराज : असो...असो... बर काय काय आहे तुझ्याकडं ? बाई : गवार, पोकला, भोपळा, टोमॅटो महाराज : बास आणि काय नाही? बाई : आणि काय पाहिजे महाराज. महाराज : ते समता आहे का? बाई : काय महाराज प्रधान : स-न-ता बाई : हासते. समता हे काय हाय ? ङ्खळ हाय का? पालेभाजी हाय ? कशी हाय. त्याची चव गोड, तिखट, आंबट...?? महाराज : प्रधानजी अहो काय है... प्रधान : बर अशी कोणतीच भाजी नसते का ? समता नावाची. महाराज : बाई या तुम्ही बाई माणसाच्या तोंडाला लागू नये म्हणतात तेच खरं. बाई : ओ महाराज तस तर बाई अजून काय बी बोलली नाय. जर ती बोलली ना तर घरातल्या पुरुषांपासूनते रस्त्यातल्या माणसापर्यंत सगळ्यांची पळता भुई थोडी होईल. ए भाजीवाली तोंड सांभाळून बोल. बाई : ओ प्रधानजी बाई माणसांची कस बोलायचं हे शिकवं आधी तुझ्या राजाला...समता भाजी पाहिजे. (ताडकन् निघून जाते.) महाराज : प्रधानजी ही बाई आपल्या काय काय म्हणाली. प्रधान महाराज पण तुम्ही असे म्हणायची काय गरज होती का? आपण आपलं समतेपुरतं बोलायचं. प्रधान .