या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराज : नाही नाही प्रधानजी काहीतरी गफलत होती आहे. चला प्रधानजी जरा राज्य फिरून येऊ बघुयात समता सापडतीये का? (दोघेही जातात.) (विक्रम वेताळाला घेवून येतो.) वेताळ : (हासत) विक्रमा त्या राजाला समता सापडली नाही. राज्यभर फिरला तरी देखील सापडली नाही आता मला सांग कुठे असेल ही समता ? (विक्रम काहीच बोलत नाही.) विक्रमा सांग कुठे असेल ही समता ? (विक्रम काहीच बोलत नाही.) उत्तर दे विक्रमा नाहीतर तुझ्या डोक्याची १०० शकलं करेन. विक्रम : वेताला समता ही कुठल्या वस्तूत, भाजीत नसते. ती माणसांच्या खोल मनात देडलेली असते. सजीव सृष्टीत मनुष्य प्राण्याला सर्वश्रेष्ठ मानले आहे. कारण ते विचार करू शकतात. केलेला विचार लोकांशी बोलू शकतो. बोललेला विचार कृतीत आणू शकतो. मनुष्यप्राण्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष एकत्र समाजात वावरत असतात. दोघेही समान आहेत. परंतु पुरुष नेहमी स्त्रीला कमी दर्जा देतो. तिला हिणवतो. कामय ती आपल्या ऐकण्यात राहिली पाहिजे असे त्याला वाटते. कायम तो तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा, सिद्ध करण्याच्या प्रयत्न करतो आणि जो पुरुष आपल्या सोबतच्या स्त्रीला मानसम्मान देतो, आदर देतो, माणसाप्रमाणे वागवतो. तिथेच समतेला सुरुवात होते आणि तीच समता असते. न दिसणारी फक्त खोल मनात जाणवणारी आणिअसा समाज राज्यात नाही जो समतेवर आधारलेला आहे असे त्या साधूंचे म्हणणे असते. वेताळ : वा...वा...वा... राजा विक्रमा एवढ्या मोठ्या प्रश्नाचं किती धीट उत्तर दिलस. वा हुशार आहेस. पण मी तुला सांगितले होते कि तू बोललास तर भी सोडून परत झाडावर जाईल म्हणून तू बोललास की भी चाललो... (जातो)