या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लघुनाटिका निवेदक - नमस्कार मंडळी, आपल्या देशाला स्त्रिया आणि पुरुष ही रथाची दोन चाक आहेत आणि ती समान आहेत असे म्हणले जाते. पुरुषांनी कमवायचे आणि बाईनी घर सांभाळायचे ही अशी कामाची विभागणी आहे. पण पुरुषाचे हे पैश्याच्या रूपात मोबदला देते तर बाईचे कान है मोबदल्याचे नसून ते तिच्या जबाबदारीचे, कर्तव्याचे आहे. म्हणून मोबदल्याशिवाय हे केलेच पाहिजे. अशी एकूण परिस्थिती आहे. दोघेही एकत्र समाजात वावरतात. पण पुरुषांचा वावर हा मुक्त आणि स्त्रियांचा वावर हा नियमांनी, अटींनी, जबाबदारींनी आणि वेळेंनी बांधलेला आहे असे दिसते. सिन - सकाळची वेळ बायको नवन्याला हाका मारते स्टेजवर फक्त बायको.) आहो उठा, ८ वाजले, अहो उठलात का? (नवरा येतो खुर्चीत बसतो.) नवरा V: (आळस देत) पेपर नाही का आला? बायको बाहेर दारात पडले असतील बघा. नवरा अग मग आत नाही का आणायचे?