या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फॉरेनर्सकडे डोळे फाडून बघायचं. मग तुझ काय म्हणणं आहे. डोळे मिटून घेवू यार तू म्हणजेना.. आणि हॅलो मॅडम गोव्यात आम्ही बाळ होऊन दूध प्यायला गेलो नव्हतो. ४ था व १: (एकमेकांना टाळ्या देतात) ये बात... हे जे फालतु दुटप्पी पुरुषी वागणारे असतात ना त्यांचा मला प्रचंड राग येतो. हे सगळे असे जमून फिरायला जातात. घरातल्या बायकांना नाही नेत. त्यांना देताना गणपतीपुळे, कोल्हापूरची आंबाबाई, जोतिबा असं नेतात. कारण त्यांना कळेल ना, यांचे उद्योग. ए माइया आयांनो माफ करा अजून किती आमची काढणार आहे. थोडी तरी ठेवा आणि विषय बदला. सगळ्या मुलीः ए बात... (टाळ्या देतात हासतात.) १ : ए चला आपण सुट्ट्यांमध्ये काय काय केलं त्यांची छोटी छोटी गोष्ट सांगायची चालेल? चांगल, वाईट सगळ हैं... एचालेल चालेल मस्त. ३ : एपण सिरियस हैं उगाच फालतूपणा नको...