या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिकार करतात. बास बास कळली अक्कल तुमची, अरे हे सगळ जे म्हणताय ना असच माझही मत होत. पण मी तिथे शिबीराला गेले, सगळा गडचिरोली जिल्हा फिरले आणि मला माझीच लाज वाटू लागली. आपण राहतो, खातो, कपडे घालतो. सुसंस्कृत समजतो. आपला जिल्हा डेव्हलप स्टेट समजतो. आपल्या राज्यात क्रांती झाली म्हणतो. जगासमोर मिरवतो, मन की बात बोलतो शी... मलाच लाज वाटली... एकाच देशात एवढा विरोधाभास. एका बाजूला खाण्यासाठी अन्न नाही दुसन्या बजाला जेवताना पोट भरले इन्हणून लाखो टन अन्न आपण फेकून देतो. करोडो रुपयांची उधळण करून मोठी मोठी लग्न लावतो. लाईट, पाणी सगळ्यांची उधळपट्टी करतो आणि त्याच वेळेला वितभर पोट भागवण्यासाठी वणवण फिरणारा आदिवासी मला दिसतो. विरोधाभास... हो... हो... मला लाज वाटते. किती सुरक्षित वाढवतात आपले आईवडिल आपल्याला असे वाटले. मगाशी रवि तु म्हणालास की विचारांनी ते मागास असतात. नाही गडचिरोली जिल्ह्यात एकही रेप केस दाखल नाही. कुठल्या मागास समाजाविषयी बोलतो