या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण, ते जे कमी कपडे घालतात तरीही स्त्रियांकडे बघून त्यांच्या वासना चालवत नाहीत. आपल्या सारख्या सुरक्षित लोकांना त्या गोव्यात जाऊन चालवतात. फॉरेनर्स बघून मला तर त्या फॉरेनर्स महिला आणि आदिवासी महिला यांच्यात कपड्यांन बाबतीत काही फरक वाटत नाही ते ही कमी कपड्यात काही नसून फरक दृष्टीचा आहे एवढेच खर. कोण कोणत्या नजरेने समोरच्याकडे बघतो हे मात्र गुढच आहे आणि हो गडचिरोली जिल्ह्यात गर्भलिंग निदानही केले जात नाही. कोणी त्यासाठी जात नाही. त्यामुळे तिथले मुला-मुलींचे प्रमाण समाज आहे. खरचं मागास ते नाहीत आपण आहोत. प्रश्न रूढींचा नसतो, परंपरेचा नसतो प्रश्न असतो आपल्या विचारांचा आणि त्या विचारांसोबत कृतीचा त्यामुळे १० दिवसांनंतर मी ठरवल आपण चार चौकटीत नाही जगणार. एक शिक्षण दोन नोकरी तीन छोकरी व मुल आणि चार म्हातारपण या चौकटी मी मोडणार. मी या लोकांसाठी कायन काम करत राहीन. मी माझ्या आयुष्यात कुठेही राहीन पण सतत मला गडचिरोली व हेमलकसा जमिनीवर ठेवेल. यू... (सगळे उठून टाळ्या वाजवतात.) क्या बात है सई.