या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महिला आरक्षण (मुल-मुली फेर धरुन रिंगण तयार करतात) देवंडीवाला: ऐका हो ऐका आला तर हसाल नाय आला तर फसाल. आज आम्ही आपल्यासमोर पथनाट्य सादर करणार आहोत. पथनाट्याचे नांव आहे महिला आरक्षण निवेदक : मंडळी आमच्या गावात एक दिवशी सरपंच रस्त्यावरून चालत असताना पोलीस पाटील तेथे येतात व त्या दोघामध्ये संवाद चालू होतो. चला बघूया तर आता काय होतय? पो.पाटील : काय सरपंच, राजकारण कसं चाललंय. सरपंच : काय नाय आमचं पद जात आलयं पो.पाटील : कसं काय सरपंच? सरपंच पाटील आपल्या गावात महिला आरक्षण पडलय, त्यामुळे आता कुठली तरी बायं सरपंच व्हेणार. पो.पाटील : मग आता कुणाला उभं करायचं हाय. सरपंच तोच इंचार करतुया मी, आमची सरपंचकी जाणार. पो.पाटील : आता काय करणार? सरपंच : मग करू की आपल्या जवळची कोणतरी उभं.