या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलगा २ : मला काय वाटतय सांगू? सगळे सांगा महाराजा मुलगा २ जेव्हा काही सुचत नाहीना लिहायला, तेव्हा ऐतिहासिक घटनांचा आधार घ्यावा. सगळे म्हणजे काय महाराजा मुलगा २ : म्हणजे लिहिण्यासाठी आधी प्रसंग डोळ्यासमोर आला पाहिजे. म्हणजे शब्द सुचतील आणि प्रसंग असे डोळ्यासमोर आणा जे माहितीतले आहे आणि आपल्याला तर ऐतिहासिक घटना भरपूर माहिती आहेत. मुलगी १ : ऐ म्हणजे शिवाजी महाराजांच्या, जिजाऊंच्या, गांधीच्या मुलगा ३ :ये गांधीच्या नको हैं मुलगी १ : का गांधीशी तुझे काय वाकडे आहे का? मुलगा ३ : नाही. गांधीशी माझ काही वाकडे नाही. गांधी सध्या तरी आपल्या मनात, वागण्यात ठेवा. त्यांना सध्याच्या परिस्थितीत बाहेर काढू नका. मुलगी २ : काय बडबडतोसय बाहेर काढू नका. म्हणजे काय? मुलगी ३ : ऐ गांधींची चेष्टा नाही हे करायची. मुलगा३ : आरे काय बडेबडेताय गांधी हा चेष्टेचा विषय असूच शकत नाही. त्यांच्या कामाविषयी बोलायचा व त्यांच्याविषयी बोलायचा आपणा कुणालाही अधिकार नाही. कारण आपण त्यांच्या मायनस ०० इतकही काम करत नाही. त्यांच्या संदर्भाने काही चुकीचा गैरसमज पसरवायला काही अकल लागत नाही. मुलगा १ : आरे मग गांधी नको असे का म्हणतोस? त्यांच्या कामाचा इतिहास चालत नाही