या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का? मुलगा २ का फक्त काळ्या पाण्यावर गेलेल्यांचा इतिहास चालतो का कपड्यांच्या होळीचा इतिहास चालतो? मुलगी १ :का अफजलखान ही मुस्लिप्त होता आणि त्याच्या कोथळा बाहेर काढणारे हिंदू राष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचांच इतिहास चालतो. सगळे बोल ना बोल ना कोणता इतिहास चालतो बोल बोल. मुलगा ३ :ए गप्प बसा... असा अविचारांच्या इतिहासांचा भडिमार केला तर मी माझा पुरस्कार परत करीन. सगळे हसतात टाळ्या देतात. मुलगा २ :पण का अस म्हणत होतास? मुलगा ३ : आरे नी गांधी बोलायला लागलो ना कि नथुराम बोलायला लागतो. सगळे जोरजोरात हसायला लागतात. मुलगी १ :ए आपण रान आणि सितेवर काही तरी करूयात का? सध्या तेच कमी वादात आहेत. मुलगा ३ पण राम आणि सिता यांचा कोणता प्रसंग दाखवू शकतो? रावणाचा दाखवूया सीतेला पळवून नेण्याचा क्रूर रावणाचा सीतेवर घाला. मुलगा २ : एक मिनीट. हे काय होत ? क्रुर रावणाचा सितेवर घाला ? क्रुर रावण ? मुलगा १ :तू काय रावणाचं समर्थन करतोयस? मुलगा २ : आरे रावण वाईट होताच पण हेल्लीच्या पुरुषांसारखा नव्हता. त्याने सीतेला पळवून