या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिता राष्ट्र सिता

सिते जर तू पवित्र असशील तर ते तुला सिद्ध कराव लागेल. : ज्या विश्वासाने ती तुमच्यासोबत १४ वर्षे जंगलात राहिले. रावणाने मला पळवून नेले पण माझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही तो माझ्याशी लग्नाची मागणी करत होता. पण मी पतिव्रता आहे आणि कायन तशीच राहणार. या माझ्या विश्वासाला कधी तडा जावू देऊ नका स्वामी. नाही तुला अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. चल चल (ओढतो.) (बेअरिंग बदलते आणि गावठी बाईप्रमाणे) ए तुला लाज नाही वाटतं, जिन तुझ्यासोबत आयुष्याची माती केली तिची अग्निपरीक्षा मागतोय. बायको म्हणजे काय खेळणं वाटलं व्हाय रे. जीन आयुष्य काढल तुझ्यावर आणि कोण्या धोब्याच्या सांगण्यावरून संशय डोक्यात घेतोस आणि अग्निपरीक्षा मागतोस लक्षात ठेव ते वरच्या पेटलेल्या लाकडांनी ती बाई घरदार संसार आणि देशही पेटवू शकते तिच्या वाटेला जाऊ नकोस ही आग आहे आग आणि सांग सगळ्या... (एकजण स्टेजवर येतो ए अस काय घडल नाही

रामायणात पडदा टाका सगले स्टेजवर येतात व जातात.) (निवेदक पुढे येतो.) निवेदक : काय मंडळी राग आला हल्लीच्या सीतेवर संशय घेणारे संशयावरुन तिला मारणारे, जाळणारे, हाकलणारे रान आपल्या देशात आहेत. का स्त्रियांनी सोसायचे असाही प्रश्न पडेल ? पण रामाने असे वागणे अपेक्षित होते का ? तो ही एक पुरुषच होता...