या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पो.पाटील : सरपंच.... देया सगळा विचार सोडून. लागा तयारीला निवडणूकीच्या. (वाद्य वाजतात, सरपंचाची बायको निवडूण येते पण तिचा नवरा माजी सरपंचाची मिरवणूक निघालेलीआहे) निवेदक : निवडणूक झाली. सरपंचाची बायको निवडून आली. समाजाने समाजाचा विचार न करता राजकारणाला निवडून दिले. हौसा (सरपंचबाई आणि तिचा नवरा घरामधील प्रसंग) अवो धनी, सनद झालं, इथून पुढे काय करायचं सरपंच : अगं तू कायपण नको करुस, नुसत्या सह्या कर, बाकी भी बघतो. हौसा : बरं, तुम्ही म्हणालं तीत सही करीन मी. निवेदक : अशा त-हेने अनेक पत्र सरपंच बाईंना येतात पण सरपंच ना कधी पूर्ण माहिती सांगत पण एक दिवशी सरपंच बाईना आलेले पहिले योजनेचे पत्र हौसा (घरचा प्रसंग) आवो धनी, सकाळी कसलं तरी पाकीट आल हाय. सरपंच : बघु आण इकडं, अगं ही तर योजनेचं पाकीट हाय! आपल्या गावात नवी योजना सुरू करायची हाय त्याच हे पाकीट हाय. हौसा : आव, कसली योजना हाय. सरपंच : अगं तुला काय कराययचं तू फकस्त सही कर. निवेदक : (अशी राजकारणाला भरपूर पत्र येतात. ना कधी सरपंच पूर्ण माहिती सांगतो योजनेची, ना हौसा कधी विचारते काय आहे ते पण त्या दिवशी त्या पत्रात तिने विचारलेच.)