या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) कोणचा असणार ? मात्र मनुष्य, पाण्याच्या चुळा महज थुकीत बसला असतो त्याच्या तोंडून उडणाऱ्या पाण्याने देखील जर यदृच्छेने कमी अधिक रम्य आकार भूमीवर निर्माण होतात, तर निवांत वेळी मन गंभीर असतां निधा- •लेल्या उद्गारांतून कांहीं बोधप्रद आणि प्रसन्नतेच्या उपासनेतून कांहीं विनोदकारक असे विचार निघून, त्यांनी न कळत कला-विलासाचें रूप घेतल्यास त्यांत अस्वाभाविक असें काय आहे ? पद्यरचनेला सकृतदर्शनीं गद्यापेक्षां कांहीं अधिक बंधनें असलेलीं दिसतात. म्हणून कोणाला वाटेल कीं, गद्यापेक्षां पद्य लिहिणें हें वरमणुकी- च्या खेळाला उपकारक न होतां अपायकारकच होईल. पण दुसऱ्या एका दृष्टीने पाहतां गद्य लेखनापेक्षां पद्य लेखनानेच मनाचे रंजन अधिक होण्या- सारखें असतें. आणि खेळाकडे कोणी उपयुक्ततेच्या दृष्टीनें पाहात नसला तरी, गद्यापेक्षां पद्याची कांहीं विशेष उपयुक्तता असते हा विचारहि जमेस धरावा लागतो. पद्याचे खाली दिलेले विशेष गुण कोणाला नाकारतां येतील असें वाटत नाहीं:-- (१) गद्यापेक्षां पद्यांत शब्द-संक्षेप करून गद्याइतकाच अर्थ प्रगट करितां येतो. पद्य हें शब्द सोडलेल्या घड्यासारखें ठरतें म्हणजे सोडलेले शब्द कोणते असावेत हें वाचकाला साध्या तर्कानेंहि सहज समजते. घड्याळाच्या किल्ली देऊन आवळलेल्या कमानीसारखी बहिःक्षेपक शक्ति संक्षिप्त वचनांत असते. तिजमुळे गद्यापेक्षा पद्य रम्य वाटतें. (२) गद्य - वाक्यरचनेचे सामान्य नियम पद्यांत न संभाळले तरी चालते. यामुळें गद्यांत न आढळणाऱ्या अशा कांहीं अपरिचित तालाचा ध्वनि पद्याच्या शब्दांतून ऐकू येतो व त्यामुळे नवेपणा वाटतो. 4 (३) गद्यांत शब्दांची ठरीव व्याकरणाचीं रूपें योजावी लागतात; पद्यांत एकाहून अधिक रूपांचा हवा तसा उपयोग करितां येतो. उदाहरणार्थ, गद्यांत ' पाहून ' हें एकच रूप वापरतां येईल. पण पद्यांत 'पाहुनि 'पाहोनि, ' 'पाहुनिया, ' ' पाहोनिया' अशी अनेक रूपें वापरतां येतात. (४) जे प्राचीन शब्द गद्यांत वापरले असतां विद्वत्तेचें मिथ्या प्रदर्शन असें लोक म्हणतील ते शब्द पद्यांत वापरले असतां सहजच शोभून जातात. कारण गद्यापेक्षां पद्यप्रकाराचें प्राचीनत्व लोक घेऊनच चालतात.