या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वरुण-कन्यका तयें विजेचा नाजुक धक्का आरपार अंगीं गेला संकट वाटुनि दचकुनि गेलों पाय काहुं लागे वरती परी कुणी ते दडपुनि धरिले पाण्यामधुनी नच निघती मनी म्हणालों मगर होइ हा तरि कांटे कांहिं न रुतले महामत्स्य जरि होइ तरि तथा पद धरण्या साधन कुठलें पाय ओढितां जाउं लागला तोल शरीराचा खाली ओढणार ती आकृति मजला मनुजवचें बोलति झाली भिऊं नको हे रम्य मानवा अपाय करि ना मी तुजला हौशी तूं रमवाया आले भूमीसम या मानि जला वोलुनि ऐसें दूर ठाकली अर्धदेह सलिलामधुनी काढुन मग ती उभी राहिली नौका एक्या करिं धरुनी मनुज स्त्रीदेह आकृतीनें, वरि कांति न परि मनुजाची वाणी आश्वासनपर झाली तरि शंका अंतरि जाची पाण्याखाली देह झांकला उदकप्रांतीं उभी कळी कमळजाति ही दिव्य कोणती चिंतुं लागलों ते वेळी धैर्य धरोनी बोलू लागलों मनुजवाणि तूं खरि वदसी परी देवता गंधर्वस्त्री किंवा यक्षिण गे अससी बोले ती स्मित करुनि लाभ तुज काय लावुनी मम थांग ? कमळकळचा तोडण्या अनुमती कोणि दिली तुज तें सांग अपराधाची क्षमा करिन तुज जरि अर्पण करिसी मजला. अर्पण कोणा करूं ही चिंता क्षणपूर्विच पडली तुजला परि न घेइ मी येथे उभ्यानें तुझ्या हातुनी उपहार वरुणलोकि चल जाउं मिळोनी बसुनि तेथ गुंफूं हार ५९.