या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ पद्य - गुच्छ नेत्रामधली चमक पाहतां तेजहि दिसतें स्पष्ट वायु संचरे सोडी सुस्कारे जैं होउनि रुष्ट आकाशासम शून्य वदन ती होइ विरही रुतुन श्री भौतिक ही स्त्रीची रुचते अधिक स्वर्गाहून छत्रपती धिःकारिति ललना प्रेम न जरि त्यांवरती 'छत्रपति' हि ना खिशांत ऐसा दरिद्रि दयिता वरिती प्रेममा जरि अंतःकरणों विपद्धिमा तो वारी शालजोडि गोधडी उभय सम मानी ती संसारी प्रेम रंगवी संसारपटी सुंदर छायाचित्र वन्य स्त्री होतसे चितारिण दिसतें जरी विचित्र चित्रकार भरि रंग विविध परि त्यांत न कांहि तजेला प्रेमी स्त्रीच्या अर्धोद्गारं पतिवदनीं जो आला कातर खचितचि विनयशील ललना पति सन्मुख असतां परि पतिकरितां चढेल पर्वत तरेल सिंधूसरिता प्रेम अंध नच मज तिसरा जणं शंकर नेत्रचि वाढे मदनदहन विक्रम तो केवळ प्रेमें त्रिभुवन पेटे विरहव्यथिता पखालभर जरि औषधरस पाजियला तरी गुण न ये तैसा जैसा प्रेमळ स्त्रीशब्दाला प्रेम रेशमी रज्जु असीचा घाय घालितां न तुटे परि मृदु म्हणुनी वांधि जया त्या स्पर्शी सौख्यचि वाटे प्रेमाच्या किल्लीनें नुघडे ऐसें कुलुप न भुवनीं विश्वकर्म कौशल्य विधीनें असें आणिलें कुठुनी प्रेमाच्या शाईनें लिहिलें अक्षर कधि नच वाळे जरी उघडिले प्रखर रवीनें आपुले द्वादश डोळे मनिचीं अपुल्या स्त्रीपति मिळणे कठिण फार या जगतीं खेळि आंधळया कोशिंबिरच्या गडया मारणें हातीं प्रेमासम दाता नच भोक्ता प्रेमासमान दुसरा