या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महारोज । १०५

असल्या गोल वाक्याची गरज नव्हती. त्याचे गोल उत्तरं म्हणजे इतरांचे माहीत नाही, पण रामदासाने असे काही केल्याचा पुरावा नाही आणि असा पुरावा मागणं कदाचित अरसिकपणाचे असेल पण 'रसिक'तेची जागा इतिहास नव्हे.
 शिवाजीची महत्ता पा-यासारखी चकाकणारी आहे. साच्यात बसवून सांगण्याइतकी ती बाब घन नाही. फुंकरीने उडवण्याइतकी ती हलकी नाही. पण चिमटीत मात्र सापडत नाही. बोटाच्या फटीतून ओघळून जाते. काळे याला जरा घाबरले असावेत. शिवाजीचे मोठेपण चर्चिताना एकतर धर्मवादी, प्रांतवादी व्हावे लागते. ते काळे यांना या ग्रंथात करायचे नाही. नसता, शिवाजी याच्या कर्तत्वावर आधुनिक विचारांची पुटे चढवावी लागतात ते काळे यांना मंजूर नाही. तिसरा मार्ग त्यांना दिसत नाही. इथे पारा निसटला आहे.

 श्री. काळे यांनी दृष्टिकोणात ज्या चुका केल्या आहेत त्या अधिक गंभीर म्हणाव्या लागतील. शहाजी याचा जन्म इ. स. १६०२ चा आहे. १६०६ साली अल्पवयात शहाजी पितृहीन झाला. निझामशाही, मोगल आणि आदिलशाही या तीन सत्तांचा सरदार म्हणून तो आपली प्रतिष्ठा सतत वाढवीत होता. १६३२ साली निजामशाही गादीवर अल्पवयीन मूल बसवून, पण स्वतःच्या नेतृत्वाखाली एक राज्य चालविण्याचा त्याने उद्योग करून पाहिला. पण त्यात त्याला यश आले नाही. १६३६ सालो शहाजी पुन्हा आदिलशाही सरदार झाला. पण ही सरदारी घेताना महाराष्ट्रातील आपली जहागीर शिल्लक राहावी एवढी दक्षता घेण्यास तो चुकला नाही. कर्नाटकात आदिलशाहाच्या वाजूने लढताना दुसरीकडे त्याने आपल्या जहागिरीची नीट व्यवस्था केली. अवघ्या सहा वर्षांच्या धाकटया मुलाच्या नावे १६३६ मध्ये त्याने मावळचा पोट मोकासा दिला. बारा वर्षांचा शिवाजी या विभागात पाठविताना आपले विश्वासू मुत्सद्दी दिले. या भागात शिवाजीला नीट कार्य करता यावे म्हणून शहाजीची जहागीर ज्या विभागात त्याच विभागाचा सुभेदार म्हणून दादोजी कोंडदेव नेमला. इ. स. १६४९ साली कान्होजी जेधे व दा. कृ. लोहकरे यांना शिवाजोच्या मदतीसाठी पाठविले. १६५५ सालपर्यंत या विभागात तो लक्ष घालीतच होता. शिवाजीची मुद्रा असणारे उपलब्ध पत्र जुन्यात जुने काळे यांच्या मते इ. स. १६४६ चे आहे. पण रामदासी खंडांत भाग ९ पान २२ वर २४ सप्टेंबर १६३९ चे मुद्रांकित पत्र उपलब्ध आहे. निदान दादोजी कोंडदेव मृत होण्याच्या पूर्वी शिवाजीचा शिक्का सुरू झाला होता, हे अमान्य करता येणार नाही. शहाजी एकाच वेळी महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याच्या उद्योगात होता, हे पृष्ठ ४१ वर काळे यांनी मान्य केले आहे. शिवाजी महाराष्ट्रात १६४२ साली आला. त्या वेळी त्याचे वय १२ वर्षाचे होते. समकालीन परमानंदाने, प्रथमप्रथम त्याचा प्रभाव जनतेवर पडला नाही प...७