पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नियमशास्त्रावर संक्षिप्त टीका. प्रक० ४२ २. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की, “जेव्हां पुरुष किंवा स्त्री परमेश्वराकडे वेगळे व्हावयासाठी नाजीर (वेगळा झालेला, नवसाने वाहिलेला, अर्पलेला ) याचा नवस करील, तर त्याने द्राक्षरस व मद्य या- पासून वेगळे राहावे, त्याने आपल्या नवसाच्या सर्व दिवसांत द्राक्षवेलांतले कांहीं खाऊ नये, आणि वस्तरा त्याच्या डोक्यावर न फिरावा. जितके दिवस त्याने परमेश्वरासाठी नवस केले असतील तितके भरतील, तोपर्यंत त्याने पवित्र असावे आणि आपल्या डोक्यावरील केसांच्या जटा वाढवाव्या. -तूं आपला देव परमेश्वर याजवळ नवस करितोस तर तो पूर्ण करायास उशीर करूं नको, परंतु नवस न केला तर तुला पाप लागणार नाही." प्रक° ४2. नियमशास्त्रावर संक्षिप्त टीका. आणि परमेश्वराने मोश्यासी बोलून इस्राएलाच्या संतानांसाठी अनेक प्रकारचे नेम व आज्ञा दिल्या. १) पवित्र असा, कां की मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे (लेवी०१९,२).- २) हे इस्राएला, ऐक, आम- चा देव परमेश्वर एकच परमेश्वर आहे. तर तूं आपल्या सर्व अंत:करणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने आपला देव परमेश्वर यावर प्रीति कर (अनु० ६,४.५). - ३) तूं आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर, कारण मी परमेश्वर आहे (लेवी० १९,१८). -४) तूं आप- ल्या भावाचा द्वेष मनांत धरूं नको; आपल्या शेजाऱ्याला बोध कर आणि त्यावर पाप राहू देऊ नको (लेवी० १९,१७). - ५) जर तझ्या शत्रूचे गुरूं किंवा त्याचे गाढव मोकार जातांना तुला अढळले तर तं ते त्याजकडे अगत्य फिरीव. जर तूं आपल्या द्वेष्याचे गाढव त्याच्या ओझ्या- खाली बसलेले पाहतोस तर त्याचे सहाय केल्यावांचून राहू नको, त्याचे सहाय अगत्य कर (निर्ग० २३,४.५). -६) ज्याचे केस पिकलेले त्या- समोर उठून उभा राहा आणि वडिलाला मान दे (लेवी० १९.३२ . --७) तुह्मास एक न्याय व्हावा; जसा देशस्थ तसा विदेशी असावा (लेवी०२४,२२). -८) कोणी आपल्या शेजाऱ्याला अपकार करील तर जसे त्याने केले तसे त्याला करावे; मोडण्याबदल मोडणे, डोळ्याबदल डोळा, दांताबदल दांत * ) (लेवी० २४, १९.२०). -९) तुह्मामध्ये