पान:पाकिस्तानचे संकट.pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ पाकिस्तानचे संकट अफझलखानाचें शव गडावर पुरण्याला परवानगी दिली म्हणून ही कबर तेथें प्रतिष्ठितपणाने राहिली आहे. अफझलखान म्हणजे कोणी मोठा राष्ट्रपुरुष अशी स्वतःची समजूत करून घेतलेले कांहीं मुसलमान ठराविक दिवशी मुंबईपासून येऊन तेथे गोळा होतात व मोठा उत्सव साजरा करतात ! इतिहाससंशोधनाची दृष्टि खोलवर व दूरवर पोंचवून वागावयाचे या मुसलमान बंधूंनी ठरविले तर त्यांच्या लक्षात येईल की, अफझलखान हा त्यांचा राष्ट्र-पुरुष होऊ शकत नाही. या दृष्टीने विचार केल्यावर मसलमानांना हेच कबूल करावे लागेल की, धार्मिक आचारविचाराच्या बाबतींत हिंदूंहून भिन्नच राहावयाचे त्यांनी ठरविलें तरी, इतिहास, परंपरा, संस्कृति, भाषा इत्यादि यच्चयावत् गोष्टींत भोवतालच्या हिंदूंशी तादात्म्य पावल्याखेरीज त्यांना दुसरा मार्गच उरत नाहीं! इतिहास व परंपरा यांचे निर्माते,संस्कृतीचे संगोपक, भाषेचे संवर्धक इत्यादींच्या वंशवेलाचे चित्र त्यांनी आपल्या चित्तचक्षूपुढे उभे करावें; म्हणजे त्यांचे मनच त्यांना असे सांगू लागेल की, या सर्व बाबतींत हिंदूंचे व आपले अभिमान विषय सारखेच आहेत ! या चित्रदर्शनाबरोबर त्यांच्या रक्तांतहि ... जागृति उत्पन्न होईल व त्यांच्या मनांत उमटणाऱ्या मुक्या बोलांना या जागतीचा पाठिंबा मिळेल! . मुसलमानांची अभिमानस्थाने, त्यांच्या हर्षामर्षाचे विषय इ० गोष्टी त्या त्या ठिकाणच्या हिंदूंच्या अभिमानाहून भिन्न नाहीत हे स्पष्टपणे सिद्ध होण्यासारखें असल्यामुळे, या मुद्यावर भर देऊन भारतीय मुसलमानांचे हिंदुस्थानांत स्वतंत्र राष्ट्र आहे हे सिद्ध करण्यासारखे नाही. मग, भारतीय मुसलमानांचें वर्णन तरी कसे करावयाचे असा प्रश्न विचारला जाईल. त्याचे थोडक्यांत उत्तर असें आहे की, सध्यांचे प्रांत आहेत असेच राहतील तोंवर, भारताच्या अकरा प्रांतांपैकी चार प्रांतांत मुसलमानांचा धार्मिक गट (Religious Group) बहुसंख्य राहील व उरलेल्या सात प्रांतांत तो गट अल्पसंख्य राहील. लोकांच्या ऐतिहासिक. विकासांतील साम्य, प्रांतांच्या योगक्षेमापुरतें उत्पन्न लाभण्याची शक्यता, या उत्पन्नाच्या व एकंदर योगक्षेमाच्या दृष्टीने पुरेसे क्षेत्रफळ व लोकसंख्या, संरक्षणाच्या (Defence.) सर्वांगीण सिद्धतेची प्रत्येक प्रांतांतल्या लोकांना महती पटण्याची जरुरी इत्यादि महत्त्वाचे मुद्दे