पान:पाकिस्तानचे संकट.pdf/188

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १७७ सुंदर माहिती संग्रहीं असतांना आणि लष्करी धोरणाच्या बाबतींत हिंदूंना मनस्वी अन्याय झालेला आहे या गोष्टीची पुरी जाणीव झालेली असतांना, भारताच्या भावी संरक्षणाच्या प्रश्नाचे विवेचन करणारे डॉ. आंबेडकर भलतेच निष्कर्ष कसे काढू शकले असा प्रश्न कोणापुढेहि सहज उभा राहील. त्या प्रश्नाचे उत्तर असें आहे की, डॉ. आंबेडकरांनी गृहीत धरलेली पहिलीच गोष्ट चुकीची आहे. मला The Mussalmans cannot be asked to give up their right to Pakistan because it adversely affects the Hindoos in the matter of their boundaries. * (सरहद्दीच्या बाबतींत पाकिस्तानची मागणी हिंदुहिताला बाधक ठरते म्हणून मुसलमानांनी पाकिस्तान मागण्याचा आपला हक्क सोडावा असें म्हणता येणार नाही.) असे डॉ. आंबेडकर अजून म्हणत अाहेत. डॉ० आंबेडकरांच्या वृत्तींत हिंदुत्वप्रेम हळहळ पण निश्चितपणे उमलूं व विकसं लागले आहे. या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून डॉ० आंबेडकर जों जो विचार करूं लागतील तों तों ते अशीच भाषा बोल लागतील की, हिंदुस्थानच्या या भूमीत अहिंदूंना हिंदुबाधक असे कसलेच हक्क नाहीत. हिंदुकुश पासून हारसमुद्रापर्यंत आणि सिंधुसागरापासून (Arabian Sea) गंगासागरापर्यंत (Indian Ocean) विस्तारलेला जो विस्तत व संपन्न भूभाग तो हिंदुस्थान-म्हणजे मुख्यतः हिंदूचे स्थान आहे. पारशी लोक या ठिकाणी आश्रयासाठी आले आणि येथील जनतेशी समरस होऊन नांदू लागले. आज ते लोक ऐश्वर्यांत आहेत. त्यांच्या वैभवाचा हिंदंनी कधी हेवा मानला नाहीं ! मुसलमान हे तर मूळचे हिंदूच ! तेही या भूमीत याच वृत्तीने नांदतील अशा समजुतीने हिंदूंनी आजवरचे सर्व व्यवहार केलेले आहेत. पण आतां जर त्यांना या पवित्र व प्राचीन देशाची निसर्गसिद्ध घडण मोडण्याची आणि त्या देशाची छकलें करण्याची दुर्बुद्धि सुचूं-स्फुरूं लागली असेल आणि त्या दुर्बद्धीला जर 'पाकिस्तानची मागणी करण्याचा आमचा अधिकार' असे ते म्हणत असतील तर त्यांना डॉ. आंबेडकरांनीहि *Thoughts on Pakistan, p. 61. ETT १२पाकि०