पान:पाकिस्तानचे संकट.pdf/199

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ पाकिस्तानचे संकट कि असेल तर ती गोष्ट त्यांची वचनानिष्ठा हीच आहे. स्वतः वचननिष्ठेला महत्त्व देणारा हिंदुसमाज इतरांकडूनहि त्या निष्ठेची अपेक्षा करतो आणि वचनभंग करणाऱ्या लोकांशी समानतेच्या भूमिकेवरून कसल्याहि वाटाघाटी करणे हे मानहानिकारक आहे, असें हिंदुसमाज मानतो. आपल्याला या वचनभंगाबद्दल पश्चात्ताप झालेला आहेझालेल्या वचनभंगाबद्दल भरपाई करण्याची आपली तयारी आहे आणि या तयारीमागे आपल्या वृत्तींत झालेला पालट मूर्तिमंत उभा आहे, अशी मुसलमान समाज हिंदूंची खात्री पटवून देईल तरच आणि तेव्हांच हिंदु त्यांच्याशी वाटाघाटी करण्याला प्रवृत्त होतील हे मुसलमानांनी नीट लक्षात ठेवावें. लखनौ कराराच्या वेळची स्थिति निर्माण करणे याचा अर्थ सिंधप्रांत मुंबई इलाख्याला फिरून जोडणे हा तर आहेच; शिवाय, पंजाब व बंगाल प्रांतांत हिंदूंना त्या कराराने जे थोडेसें अधिक प्रतिनिधित्व मिळाले होते त्याला मान्यता देणे हाहि अर्थ त्यांत अभिप्रेत आहे. एवढयानें वायव्य सरहद्द प्रांताचा प्रश्न मिटणार नाही. कारण लखनौ कराराच्या वेळी या प्रांताला स्वतंत्र प्रांताचा दर्जाच मिळालेला नव्हता. या प्रांतांतील हिंदु व शीख यांचें संयुक्त संख्याबलहि अत्यल्प आहे. हा प्रांत आर्थिक दृष्ट्या अगर अन्य दृष्ट्याहि स्वतंत्र होऊन नांदण्यासारखा नाहीं; म्हणून तो प्रांत पंजाबला जोडण्याला तूर्तची तडजोड म्हणून मुसलमानांनी तयार झाले पाहिजे. पंजाब व सरहद्द प्रांत मिळून सर्व मुलुखाचा राज्यकारभार एकत्र चालविण्याचे ठरल्यावर, त्या मुलुखांतील हिंदु व शीख या संयुक्त लोकसमूहाला मुसलमानांनी भरपूर संरक्षण कायदेशीरपणाने दिले पाहिजे. मुंबई, मद्रास प्रभृति प्रांतांतून हिंदूंनी मुसलमानांना जे संरक्षण लखनौ-करारान्वये दिलेले आहे ते देण्याची नैतिक जबाबदारी हिंदूंवर नव्हती आणि नाहीं. _हिंदूंच्या नसांतून पिढ्यानपिढ्या वाहात राहिलेलें सहिष्णु रक्त " हेच अहिंदूंचें खरें संरक्षण आहे; इतर कसल्याहि प्रकारचे संरक्षण 2. मागण्याचे धाष्टयं अहिंदूंनी करणे म्हणजे हिंदूंच्या उज्वल परंपरेचा उपमर्द करणे होय, असें लखनौ-कराराच्या वेळी हिंदूंना म्हणतां न आले असते.