पान:पाकिस्तानचे संकट.pdf/203

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ पाकिस्तानचे संकट असें नाही. - सदाशिवराव भाऊसाहेब पेशवे यांनी दिल्लीचे तख्त फोडून मुसलमानी इभ्रतीला घणांच्या घावांचा प्रसाद दिला तसाच प्रकार या ठिकाणींहि करण्याची बुद्धि मल्हारराव होळकरांना सुचली होती. मुसलामानांच्या भावना निष्कारण दुखविल्या जाऊ नयेत अशी वृत्ति भोवतालच्या हिंदुसमाजानें धारण केल्यामुळेच तो प्रकार घडून आला नाही. मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा हिंदुसमाजाने आजवर यथेच्छ मान ठेविला आहे. मुसलमानसमाज हिंदूंच्या धार्मिक भावना मानण्याला कितीसा राजी आहे याची परीक्षा ठरण्याची वेळ आज आलेली आहे. मुसलमानसमाज काशी क्षेत्रांतील श्रीविश्वनाथाचें हैं पुरातन मंदिर पूर्वीच्या वैभवांत नांदतें करून देईल तर जगाला व हिंदुसमाजाला असें सहज पटेल की, आपल्या धार्मिक भावनांना जिवापाड जपणारा मुसलमानसमाज हिंदूंच्या धार्मिक भावनाहि तितक्याच आस्थेने मानण्याला तयार आहे. या मुसलमानसमाज ही गोष्ट करील तर भूतलावर स्वर्गच अवतरला की काय, असें हिंदुसमाजाला वाटू लागेल. पं० मालवीयजींसारखे श्रीविश्वनाथाचे भक्त तर मुसलमानांच्या या ठसठशीत कृतीमुळे गहिवरून येतीलच; पण, या कृतीचा परिणाम एवढ्याच मर्यादेत अडून राहील, असें नाहीं. काशीक्षेत्र व तेथील श्रीविश्वनाथाचे मंदिर हे नेपाळपासून रामेश्वरपर्यंतच्या आणि द्वारकेपासून दार्जिलिंगपर्यंतच्या गरीब, श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी, नव्या, जुन्या अशा सर्व हिंदूंच्या अभिमानाचे स्थान आहे. त्याच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी मुसलमानसमाज आपला आग्रह क्षणमात्र दूर ठेवील तर, एकंदर हिंदुजगांत मुसलमानांच्या या नव्या वृत्तीबद्दल पूर्ण विश्वास उत्पन्न होईल. अशा परस्परविश्वासाच्या पायावर हिंदु-मुसलमानांचे जे ऐक्य निर्माण होईल तेच ऐक्य चिरकाल टिकेल व तेंच ऐक्य सगळ्या हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळविण्याला व टिकविण्याला उपकारक ठरेल. ___ मुसलमानांच्या अगर इतर कोणाहि अहिंदूच्या धर्मभावना डिवचाव्या असें हिदुसमाजाने आजवर कधी मनांत आणलें नाहीं, आजहि तो विचार हिंदुसमाजाच्या मनांत येत नाही आणि पुढेहि तसला विचार हिंदुसमाजाच्या मनांत नांदेल असें म्हणवत नाही; पण,