पान:पाकिस्तानचे संकट.pdf/233

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ पाकिस्तानचे संकट समप्रमाण वांटणी या दोन्ही दृष्टींनीं तो थारेपालट अधिक श्रेयस्कर व अधिक फलदायी ठरणार नाही काय ? आज हे उत्सव ज्या त-हेनें साजरे होतात व या उत्सवांमुळे ज्यांचे मनोरंजन होतें त्या त-हेचा व त्या लोकांचा विचार केला म्हणजे, तृषार्ता भागल्या जीवा । मिळेना थेंबभर पाणी ।। जयांची वासना-पूर्ति । तयांसी अमृती न्हाणी ॥ या कविवचनाचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. ' 'हिंदु समाजांत जी विषमता नांदत आहे त्या विषमतेची अनेक उदाहरणे दाखवितां येतील. उत्सव हे त्यांतलें एक साधे उदाहरण होय. ही विषमता चौफेर पसरलेली आहे आणि ती नष्ट करण्याचे उद्योग सतत व जाणतेपणाने झाले तरच खरें हिंदुसंघटन घडू शकेल. ही विषमता नष्ट करण्याची जुनी साधनें समाजांतून नाहीशी होत चालली आहेत. आणि त्यांच्या जागी नवी साधनें निर्माण करण्याची तत्परता दाखविली गेलेली नाही. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, शक्तियज्ञ इत्यादि यज्ञद्वारा समाजांतील विषमता नाहीशी करण्याचे जुने मार्ग बुजून गेले आहेत. पूर्वीच्या काळी बऱ्या स्थितींतल्या . कुटुंबांतून अशी रीत आढळे की, चातुर्मास्यांत बाळभूक म्हणून गरीब कुटुंबांतल्या एकाद्या अर्भकाला नेमाने थोडेफार दूध द्यावयाचे. ..। . ज्याच्याजवळ अधिक आहे त्याने गरजवंताला त्यांतलें थोडें फार दिले पाहिजे, या सिद्धांताची अंमलबजावणी अशा रीतीने . सी. पूवी होत असे. आपल्या समाजांत रूढ असलेल्या कहाण्या, व्रतेंवैकल्ये व रिवाज यां यामागील. उद्देशांचा या दृष्टीने कोणी तपास केला तर हिंदुसमाजांत समता प्रस्थापन करूं पहाणाऱ्यांना तो उद्योग फार मार्गदर्शक ठरेल. सुस्थितींतल्या कुटुंबाने गरीब कुटुंबांतल्या एका अर्भकाला दूध पुरवावें अशी रीत पूर्वीच्या काळी असे. आज त्या रीतीला वेगळे वळण लावून हिंदुसंघटनवाद्यांना तोच उद्देश साध्य करावा लागेल. ज्या तीन वर्षांच्या खालील मुलांना दुधाचा टांकहि मिळू शकत नाही अशी मुलें शहरांत व खेड्यांत हज़ारों आहेत. N