पान:पाकिस्तानचे संकट.pdf/247

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ पाकिस्तानचे संकट उमटविणे हे, प्रत्येक कार्यारंभी श्रीगणेशपूजन करणाऱ्या हिंदूंना अवघड घाटतां कामा नये. श्रीगजानन हा देव 'व्रातपति' या नावाने ओळखला जातो. इतस्ततः भटकत फिरणाऱ्या वन्य जमातींचे नेतृत्व संपादून व त्या जमातींना आपल्या संस्कृतीत समाविष्ट करून मान्यता पावलेल्या गजाननाची पूजा सार्थ व्हावयाची असेल तर, अशा अनेक जमापतींच्या उद्धाराकडे लक्ष पुरविल्याशिवाय हिंदुसंघटन कार्य करणा, रांना गत्यंतरच नाही. अशी कायें तांतडीने पार पाडून व हिंदुस्थानांतल्या कोटिसंख्य हिंदुसमाजांत समान संस्कृति, समान आचार, समान विचार यांची संस्थापना करून हिदु-संघटनवादी कार्यकर्त्यांना आफ्रिका, अमेरिका, वगैरे खंडांकडे वळावयाचे आहे. कोणत्याच संस्कृतीत समाविष्ट न झालेले कोट्यवधि लोक या दोन खंडांत आहेत व या पोरक्या लोकांना इस्लामी व त्रिस्ती संस्कृतीत खेचून आणण्याचे कार्य यापूर्वीच सुरू झालेले आहे. या दोन्ही संस्कृतींना पायबंद घालण्याची उमेद हिंदुसंस्कृतीच्या अभिमान्यांनी धरिली पाहिजे. . हे कार्य मोठे आहे व त्याच्या सिद्धीसाठी मिशनरीवृत्तीच्या पराक्रमी हिंदूंची परंपरा निर्माण झाली पाहिजे. अशी परंपरा निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न श्रीसमर्थ रामदासांनी पूर्वी केला. भोळ्या भक्तिभावाच कोडकौतुक करणारा वारकरीसंप्रदाय आजतागायत टिकून राहिला आहे. पण, क्रियावादावर भर देणारा रामदासीसंप्रदाय केव्हांच नामशेष होऊन गेला आहे! या वस्तुस्थितीपासून बोध घेऊनच, या मिशनरीकार्याचे स्वरूप 52525252525sesesaseseses.25252525252525-Se 2sesasas अनासपुरे अँड सन्स 72sesasses25250 कर देशी व विलायती भाजीपाल्याच्या बियांचे व्यापारी ७१५, सदाशिव पेठ, पुणे २८ 7 Ssesesesesesesesesesesese 52seseseseses.