या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ पाणिपतची बखर काय असे वाटू लागले. सरदारांनी सल्लामसलत केली. त्यांनी पाहिलें कीं असे झाले तर सैन्य उधळून जाईल. त्यापेक्षां उद्यां छावणीतून बाहेर पडून लढाई करावी. ( पा. संग्राम. पृ. ७८)। समय तर तुटक व दुर्घट प्राप्त जाहाला - पानिपतावरील निकाली युद्ध होण्यापूर्वीची कठीण अवस्था. प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत असतांना भाऊसाहेव आणि विश्वासराव यांची येथील भाषणे बखरकाराने अंतःकरण हेलावून सोडणारी अशी दिली आहेत. रूमशाम येथील सरदेशमुखीच्या वतनाची वस्त्रे मिळविण्याची प्रतिज्ञा तर या निदानसमयीं अधिकच धारदार वाटते. पृ. ३७-३८ क्रमांक ३१-३२ - पानिपतचा १४ जानेवारी १७६१ चा संग्राम अगदी अटीतटीचा झाला. दोन्ही पक्षांकडील -मराठे व दुराणी- वीरांना पराक्रमाची शर्थ केली. याचे वर्णन बखरकाराने मोठ्या आवेशाने केल आहे. स्वतः अब्दालीने जयपूरचा राजा सवाई माधवसिंह याला लिहिलेल्या पत्रांतील वर्णन पाहावे. 'सिंहासारखे शूर वीर आणि शक्तिशाली शिपाई विजेप्रमाण एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी गाजविलेले शौर्य यापूर्वी कधींच दृष्टीस पडलें नाहीं. रुस्तुम आणि इस्फिदारसारख्या वीरांनी हे युद्ध पाहिले असत तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटें चावली असतीं ...' ( पा. संग्रामः मृ. ४२ ) मृ. ४२) निजामुद्दीन या कवीने अब्दालीच्या जीवनावर ‘शहनामाये अहमदिया। हे काव्य केले आहे. त्यांत या युद्धाचे काव्यमय वर्णन आले आहे. तो म्हणतो, 'दोन्ही सैन्ये प्रचंड पर्वताप्रमाणे भासत होती. सैन्याच्या धुराळयाने अंधार पडला. परमेश्वराने जणू त्याच दिवशीं प्रळय घडवून आणण्याच ठरविले होते. दोन्ही सैन्यांतून तोफांचा मारा होऊ लागला तेव्हां चोहीकडून आगीचा दर्या वाहतो असे वाटले. उभय सैन्यांनी शौर्यात कोणताच कसूर केली नाही. ( पा. संग्राम, पृ. ७१ )