या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉ. सौ. कुसुम व्यं. कुलकर्णी डॉ. सौ. कुसुम व्यं. कुलकर्णी यांनी आपल्या अध्ययनकालात सतत प्रथम श्रेणी आणि पारितोषिके मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. एम्. ए.ला प्रथम श्रेणीत येऊन त्यांनी मराठीची तीन पारितोषिके मिळविली. ‘मराठी कादंबरीतील मनोलेखन' ( इ. स. १८५५ ते १९५५ ) हा प्रबंध लिहून त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच डी. पदवी घेतली या प्रबधाला पुणे विद्यापीठाने डॉ. य. वि. परांजपे पारितोषिक बहाल केले आणि उत्कृष्ट प्रबंध म्हणून त्यांचा गौरव केला. सखोल संशोधन, चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोण आणि समतोल विवेचन यांचा परिपाक म्हणजे त्यांचा हा प्रबंध होय. प्रस्तुत पाणिपतच्या बखरीच्या संपादनात त्यांची हीच गुणवैशिष्ट्ये प्रगट झाली आहेत.