पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| पानसे घराण्याचा इतिहास. थोडी फार मदत मिळते, व त्याप्रमाणे कांहीं सरदार मंडळी तोतयाला मिळाली. या तोतयाची हकीकत इतिहासज्ञांना माहीत आहेच. थोरल्या माघवरावसाहेबांनी त्याला पकडून बंदत ठेविले होते. त्याची रवानगी या किल्यावरून त्या किल्लयावर अशी होत असे. शके १६९८ च्या वैशाखाच्या सुमारास तोतया रत्नागिरीच्या किल्लयांत अटकेंत होता. या वेळी रत्नागिरीचा सुभा रामचंद्र नाईक परांजपे या सावकाराकडे होता. नाईक हा तोतयास फितुर होऊन त्यानें तोतयाला कैदेतून सोडले व त्याच्या नांवाची द्वाही फिरविली. पुढे तोतयाने हजारों सैनिक जमविले आणि कोंकण प्रांत काबीज करण्याचा सपाटा लावला ( ज्येष्ठ ). विजयदुर्ग व देवगड हे किल्ले त्याच्या स्वाधीन झाले, एवढेच नाही तर पेशवे सरकारांचे आरमार, धुळप या सरदारांकडे होते, ते हि त्या सरदाराने तोतयाच्या हवाली केले. त्यामुळे त्याला बळ येऊन त्याने अंजनवेल व गोवळकोट हे दोन किल्ले घेतले. या प्रमाणे तोतया * शेणाचा होता, तो लोखंडाचा झाला. यामुळे, कारभा-यांना त्याच्याकडे लक्ष देणे जरूर झाले. त्यांनी एका सरदारास दोन हजार गारद्यांनिशी त्याच्यावर पाठविले. ही फौज अंजनवेलीच्या जवळ गेली व लढाईस तोंड लागणार तोच आयत्या वेळी ते गाडदी कोकणचे राहणारे असल्याने, फितूर होऊन उलट तोतयास च मिळाले. तेव्हां तो सरदार व त्याचे कांहीं आरब तेवढे निसटून घांट चढून प्रतापगडच्या आश्रयास आले. नंतर, तोतयाने सुवर्णदुर्गावर स्वारी केली. हा किल्ला हरिपंत फडक्यांच्या पुतण्याकडे होता. तोतयाने किल्ला घेऊन फडक्यांस कैदेत ठेविलें आणि अंबा घांट चढून मलकापूर हि घेतलें. त्यानंतर त्याने बहुतेक उत्तर कोंकण हस्तगत केले, तेव्हा तिकडील माणकर, सुर्वे वगैरे कित्येक सरदार हि त्याला मिळाले. या पूर्वीच हरवा अण्णा पटवर्धन, व्यंकटराव घोरपडे इचलकरंजीकर इत्यादि वजनदार सरदार त्याला सामील झाले होते. इंग्रज, करवीरकर व हैदर यांनी त्याला उत्तेजन दिले होते ते निराळे च. या सर्व कारणांनी त्याला जोर येऊन, जवळच्या वीस हजार फौजेनिशी, तोतयाने बोरघांट चढून राजमाची हि घेतली. सिंहगडचा किल्लेदारसुद्धा या वेळी त्याला अनुकूल होण्याचा रंग दिसू लागला ( आश्विन ). | इतके झाल्यामुळे, आतां यापुढे तोतयाची उपेक्षा करणे अशक्य झाले म्हणून बारभाईंनी भिवराव पानसे यांना हाताखाली दोन हजार पायदळ व तोफा देऊन त्याच्यावर पाठविले आणि शिंदेहोळकरांना भिवराव यास कुमक करण्यास आज्ञा केली ( शके १६९८ भाद्रपद ). त्यांत महादजी शिंदे यांनी या कामी मनापासून हातभार लावला, एवढेच नव्हे तर, या मोहिमेचा सर्व भार त्यांनी खुषीने आपल्या शिरावर घेतला. होळकरांनी मात्र मनापासून काम केलें नाहीं ( ख. ऐ. ले. सं. २६७०-२६७१ ). पाटीलवावांनी सिंहगडाखालील तोतयाची जी आरवांची चौकी होती ती मारून काढली, व तेथे होळकरांस ठेवून आपण बोरघांटाकडे वळले. इकडे