पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ | प्रकरण पांचवें. पाटीलबावा तेथे जाऊन पोहोचण्यापूर्वी च भिवराव पानसे यांनी तोतयाशी दोन तीन लढाया मारून त्याला मागें रेटले होते. या शिवाय त्याजकडील कर्णा व निशाणे हिसकावून आणली होती. त्याचे हजार दीड हजार माणूस हि कापून काढले होते ( कित्ता २६९१ ). नंतर राजमाचीच्या पायथ्यास तोतयाचा गोट होता त्यावर पाटीलबावांनी हल्ला करून व शेंकडों लोक मारून तोतयाच्या उरलेल्या फौजेची दाणादाण उडविली ( आश्विन शुद्ध पौर्णिमा ). तेव्हां त्याची फौज उधळली व खुद्द तोतया दोन तीनों लोकांनिशीं पळून कोंकणांत निसटला. त्याच्या पाठीवर पाठलाग करण्याकरितां पाटीलवावांचा दिवाण बाळाराव गोविंद हा तत्काळ निघाला. पटवर्धनांचा वकील म्हणतो की, या प्रकरणांत * शिंदे व राजश्री भिवराव यांनी ( मेहनत ) फार केली " ( कित्ता २६९४.). या वेळीं तोतयाने किल्ले राजमाची येथे गडदेंत सोने व रुपें ठेविले होते; ते मजमदार प्रांत वसई यांनी मोजदाद करून आणले. त्यापैकी ९९८८१३ किंमतीच्या पुतळ्या व ११९८६८७ किंमतीचे सोने, १२३२६८४ किंमतीचे रुपे व ७५० रुपये किंमतीची एक माळ मिळून २४७७१८८ चा माल भिवराव यांचे कीर्दीस जमा केलेला आढळतो ( स. मा. रा. २०१३९ ). तोतया निसटला तो बेलापुरास येऊन गलबतांत बसून मुंबईस इंग्रजांच्या आश्रयास जाण्यासाठी निघाला. ही बातमी रघूजी आंग्रे यांना कळल्याबरोबर, त्यांनी ताबडतोब जाऊन तोतयाचें गलबत पकडले व त्याला त्याच्या सर्व लोकांनिशीं कैद केले. तेव्हा त्याने रघूजीपासून वचन घेतले की, माझी चौकशी झाल्याखेरीज मला शिक्षा होऊ नये. त्याप्रमाणे रघुजीने वचन दिले व तोतयास घेऊन ते पुण्यास आले. पाटीलबावा हि त्यांना वाटेत येऊन मिळाले. । २. तोतयाचा शेवट व भिवरावांवर सरकारचा विश्वास तोतयाची चौकशी सुरू झाली; तींत रामशास्त्री, गोपीनाथ दीक्षित, हरिपंत फडके, बाबूजी नाईक वगैरे पंच होते. या सर्वांच्या मते तोतया खोटा ठरला. नंतर त्याची धिंड काढून शहरांत मिरविली. मग मेखसूने त्याचे डोके फोडून त्याला देहांत शासन देण्यांत आलें ( शके १६९८ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ). तोतयाच्या पारिपत्यास भिवराव यांस जेव्हां सरकारांतून पाठविण्यांत आले तेव्हां त्यांच्याजवळ अधिकारदर्शक म्हणून पेशव्यांच्या मुतालकीची शिक्केकट्यार देण्यात आली होती. याचा अर्थ असा की, मसलत संबंधानें कोंकणांत किल्लयास वगैरे कौल, सनदा, पत्रे द्यावी लागः तील त्यांवर शिक्के करीत जाणे (परिशिष्ट क्रमांक १५ पहा ). सरकारचा येवढा मोठा भरंवसा भिवरावांवर होता हे यावरून समजून येते. । ३. जयवंतरावांस तोफखान्याच्या मजुमेचा अधिकार. । या तोतयाच्या गडबडीच्या वेळी पानशांची तैनात वाढविण्यांत आली. शके १६९७ ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी सरकारांतून जो तैनात जाबता ठरला गेला त्यांत