पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/145

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. १०५ मजकूर लिाहला, त्याचवरून मशार निल्हे ( पानसे ) यांचे पत्र व गोलंदाज वगैरे इकडून रवाना केले च आहेत. तेथे आल्यानंतर जे फस गोळे मिळतील ते देऊन रवाना व्हावें ” ( खरे ऐ. ले. सं. पृ. ६२४६ ). यावरून सवाई लक्ष्मण व अस्मान तडाखा या दोन मोठ्या ताफा या स्वारींत होत्या. कोल्हापुरास पाण्याचा पुरवठा गांवच्या जवळच्या पद्माळे, रंकाळे, वरुणतीर्थ वगैरे तळ्यांपासून व जिंतीच्या ओढ्यापासून मुळे प्रथम ह्या पाण्याच्या पुरवठ्याची ठिकाणे ताब्यात घेतली; त्यामुळे गांवांतील लोकांचे फार हाल होऊ लागले. गांवांतील लोकांनी व महाराजांनी हि या अरिष्टशमनार्थ देवास अनुष्ठाने बसविली होती व स्वतः महाराज हि संधि सांपडली म्हणजे पन्हाळ्याहून उतरून पेशवे सरकारच्या मोर्ध्यावर हल्ले करीत असत. महाराज धूर्त असल्याने त्यांनी या वेळी नानांच्या मृत्यूचा व पेशव्यांच्या दरबारांत बजबजपुरी माजल्याचा फायदा घेऊन, शिंद्यास वश करून घेतले. कोल्हापूरकर महाराजांनी या वेळी शिंद्यास बरीच रक्कम चारली. या मोहिमेचे आद्य कारण रामचंद्र आर ल्यामुळे त्यांना कोल्हापुराहून हालविणे शिंद्यास जरूर होते. यासाठी पैशावर दृष्टि ठेवून स्वराज्याला घातूक होणारी कृत्ये करणाच्या दौलतराव शिंद्याने आप्पावर दोन लाख रुपयांची वरात काढली आणि ती वसूल करण्यासाठी जी लष्करी तुकडी पाठविली, • तिला असा हुकूम देऊन ठेविला कीं, रक्कम ताबडतोब वसूल करावी, तसे न झाल्यास आप्पांना एकदम कैद करावे. ही बातमी कळताच आप्पांनी रात्रीच आपल्या विश्वासांतील गोखले, पानसे, जाधव वगैरे सरदार मंडळी जमवून मसलत केली व तींत ठरल्याप्रमाणे दुसरे दिवशीं सूर्योदयापूर्वी कोल्हापूरचा वेढा उठवून त्या सर्वांनी आपल्या सैन्यासह कर्नाटकाकडे कूच केले. दौलतरावासारख्या नादान माणसाच्या -या कृत्यामुळे करवीरकरावरील स्वारीचा असा शेवट होऊन, पुणे दरबारचा दरारा नाहीसा झाला, यानंतर कोल्हापूरकरांचा एक हस्तक बाळकृष्ण गंगाधर याने बंड उभारले, त्यावर नाना पुरंदरे व गणपतराव पानसे यांनी स्वारी करून त्याचा पराभव केला. नंतर गणपतरावांनी आपला तोफखाना शिंद्याकडे फिरविला. या वेळी शिंद्याजवळ फौज फारशी नव्हती, या मुळे तो पळून गेला. 'गणपतरावाजवळ या प्रसंगी पांच हजार सैन्य व मुबलक तोफा होत्या. शिंदा निसटून गेल्यामूळे पानशांनीं तें सैन्य गलगले, गडदीहाळ वगैरे ठिकाणच्या बंडखोर जहागीरदारांचे मुलखांत नेऊन त्यांना नरम केले. C 2 •