पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/187

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. ४. जाधवांचे उपाध्येपण. दिवें गांवच्या हद्दीत जाधवांनी वाडा बांधून त्या सभोंवतीं वस्ति केली, त्यास 'जाधवाची वाडी' असे म्हणतात. जाधवांचे उपाध्येपण पूर्वीपासून पानसे यांच्याकडे होते. तत्संबंधी श्री. शाहू छत्रपति यांचे एक पत्र उपलब्ध झाले आहे, ते इतिहासप्रसिद्ध पिलाजी जाधवराव यांचे नांवचे आहे. ते असेः

  • राजेश्री पिलाजी जाधवराव यास आज्ञा केली ऐशी जे, राजेश्री खंडो शिवदेव पानसे जोशी कुळकरणी मौजे दिवे कर्यात सासवड यांचेकडे उपाध्येपण, अष्टाधिकार, पूर्वीपासून तुमचे घरचे आहे. त्यास गतवर्षी राजेश्री सटवाजी जाधव हुजूर आले असतां, त्यांची उपाध्येपणाची वृत्ति त्यांस चालविणे, म्हणोन आज्ञा केली. त्याजवरून त्यांनी यास उपाध्येपणाचे वृत्तिपत्र, राजेश्री मल्हार तुकदेव पुरंदरे देशपांडे कर्यात सासवड यांचे विद्यमाने करून दिले, ते हुजूर मनास आणले. व राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांनी मनास आणले. तरी तुम्ही आपले उपाध्यक, उपाध्येपणाचा मान व धर्मीश व आचार्यत्व, अनुष्ठान प्रसंगाचे व देवार्चन व लग्नमुहूर्त वगैरे मानपान खंडो शिवदेव यासी देऊन याची उपाध्येपणाची वृक्ति यास चालविणे व सटवोजी जाधव यांणी, शिवाजी खंडेराव यास, नेहमी येऊन राहाणे म्हणजे तुम्हांस एक असामी देऊन तुमचे उपाध्येपण तुमचे हातून घेऊ म्हणोन मान्य केले होते. त्यावरून यास सरकारांतून आज्ञा देऊन तुम्हांकडे पाठविले आहेत, तरी आपलें देवार्चन यांचे स्वाधीन करून उपाध्येपणाचे प्रयोजन यांचे हातून घेऊन यांचे चालविणे. हे आपले भाऊबंद अगर मुतालिक ठेवून उपाध्येपण चालवितील. दुसन्यास यांचे उपाध्येपणाचे प्रयोजन करण्यास दरकार नाहीं. मुक्कामी अगर स्वारींत उपाध्येपणाचे प्रयोजन यांचे हातून घेत जाणे. यांचे चालविणे स्वामीस जरूर असे. जाणिजे छ २१ साबान सल्लास आवैन मया व आलफ. "

५. पुरंदरे व पानसे यांचा शरीरसंबंध, पुरंदरे व पानसे यांच्यांत शरीरसंबंध होत नाही. याला जें एक कारण घडलें तें धार्मिक नसून निराळे च आहे. सगोत्र अगर सप्रवर वगैरे धार्मिक कारणे याच्या आड आलेली नाहींत. दोन्ही घराण्यांची गोत्रे भिन्न भिन्न आहेत. असे असतां खालीं दिलेली गोष्ट घडल्यापासून हा संबंध सुमारे गेल्या दोन तीन शें वर्षांत झालेला आढळत नाहीं. | एकदां या दोन घराण्यांत शरीरसंबंध होण्याचे ठरून तिथि-निश्चय झाला व व-हाडी मंडळी हि लग्नास आली. लग्न लागण्यापूर्वी मानपानासंबंधानें कांहीं भांडण उपस्थित होऊन ते विकोपास गेले व लग्न फिसकटले. यावेळी संताप येऊन दोन्ही घराण्यांतील पुरुषांनी एकमेकांशीं शरीरसंबंध करू नये अशा शपथा घेतल्या व तीच शपथ त्यांनी आपल्या पुढील वंशजांस हि घातली.