या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, बौद्ध पुराणकथांचा आधार कलावंताच्या प्रतिभेला मोकळे करील. या दोन विधानांत थोडासा भाषाभेद आहे. माणसाला मोक्ष की प्रतिभेला मोक्ष, हा फरक आहे. पण त्यात श्रद्धाभेद फारसा दिसत नाही.
 वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदू पुराणकथा आणि बौद्ध पुराणकथा यांच्यात कथानकभेद आहेत; मूल्यभेद नाहीत. बौद्ध पुराणकथा तथागताला मानव समजणाऱ्या प्राचीन हीनयान्यांच्या कथा नाहीत. त्या तथागताला देव मानणाऱ्या महायानपंथीय किंवा उत्तरहीनयानपंथीय कथा आहेत. बुद्ध हा मानव होता तोपर्यंत पुराणकथा निर्माण होणारच कशा? एकदा तथागताचा भगवान झाला म्हणजे मग सर्व रस्ते मोकळे होतात. इकडे कपोतासाठी मांस देणारा राजा शिवी हिंदूंचा शरणागत आहे. तिकडे बौद्ध धर्मात आपलेच दात स्वतः कापून अर्पण करणारा छद्दन्त आहे. इकडे गर्भातून वेदमंत्रांचा उच्चार करणारा पाराशर आहे. तिकडे पाचव्या वर्षीच चौदा विद्या, चौसष्ट कला आणि छप्पन्न लिया जागणारा पाच वर्षांचा बालबुद्ध आहे. मलोगणती दूर रेड्याचा सांगाडा अंगठ्याने फेकणारा आमचा राम तर हत्ती फेकणारा त्यांचा बुद्ध. तिकडे ज्ञानाच्या शोधार्थ यशोधरेचा त्याग आहे, तर इकडे मोक्षाच्या शोधार्थ देवहूतीचा त्याग आहे. तांत्रिक अधःपतितांनी इकडे कृष्णाला राधा दिली आहे तर तिकडे बुद्धाला तारा दिली आहे. त्याग, वैराग्य, संयम, इंद्रियदमन, निर्वाण, अवतारवाद, धर्मपुरुषाचे आशीर्वाद, शाप, सामर्थ्य, त्यांचे ऐश्वर्य- ही सगळी मूल्ये दोन्हीकडे सारखी आहेत. इसवी सनाच्या प्रारंभानंतर बौद्ध आणि वैदिक यांच्यातील फरक जीवनमूल्यांचा उरला नव्हता. तत्त्वज्ञानातील काही मुद्दयांचा व उपास्यदेवतेच्या नावाचाच हा फरक होता. सगळ्या बौद्ध पुराणकथा या कालखंडानंतरच्या आहेत. मूल्यभेद नसणाऱ्या या हिंद , बौद्ध आणि जैन परंपरेच्या पुराणकथा एकाच संस्कृतीची अपत्ये आहेत. त्या वापरायच्या की नाहीत, हा कलावंताच्या प्रकृतिभेदाचा भाग आहे. पण पुराणकथा प्रतिभेला बांधीतही नसतात, मोकळेही करीत नसतात. बंधन जीवनातील श्रद्धांचे असते. पुराणकथा या बंधनात उपयोगी पडतात. हे श्रद्धाळूपणाचे बंधन तुटले म्हणजे मुक्त मन पुराणकथांना नवे अर्थ देऊ लागते.

 जे आज घडते आहे, तेच मागोमागही घडले आहे. कनिष्ठ समाजातून वर आलेले लेखक वरिष्ठ वर्गाचा जीवनविषयक दृष्टिकोण स्वीकारीत असताना दिसतात. यज्ञयागप्रधान जीवनात जे शक्य झाले नव्हते, ते भक्तिमार्गाने सर्व भारतभर घडवून आणले. सर्व प्रांतांमधून कनिष्ठ समाजातून नवे साधुसंत उदयाला आले व सर्वांनाच वंदनीय ठरले. त्यांनीही काव्यरचना केली आहे. महानुभाव संप्रदायातील दामोदर, नरेंद्र, भास्कर हे जरी वरिष्ठ वर्गीय ब्राह्मण असले, तरी वारकरी सांप्रदायिक नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, चोखामेळा ही संत मंडळी बहुजनसमाजातून उदयाला आली होती. मराठी अभंगवाणीतील जवळजवळ सगळी कविमंडळी बहुजनसमाजातील आहेत. आणि हे काव्य प्राचीन मराठीतील आत्मनिष्ठ काव्य आहे. पण त्यांच्या कवितेत सामाजिक प्रक्षोभ

१०० पायवाट