या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुले गळलेली नाहीत. स्तनचंदन तसेच आहे, ओठांवर चावे नाहीत. मखला सुरत्रित आहे. असंगाचा संग झाल्यामुळे गेलेली त्रस्त रात्र दिसतेच आहे. ही मला न पाहताच जाणार काय ?
पण नाही. परतली. काय म्हणतेस ? तू मला पाहिले नाहीस ? तुझा दोष नाही बाळ. माणूस दुःखाने घाबरला की बुद्धीही बावचळून जाते. माझा आशीर्वाद घे.
 " तुझे इष्टजन १७ धनवान असोत. नावडते दरिद्री असोत. मातेच्या लोभीपणामुळे नावडत्याचा सहवास तुला भाग न पडो."
कुठून येत आहेस पोरी ? काय म्हणतेस, सार्थवाह धनदत्तपुत्र समुद्रदत्ताकडून ? वा!! आनंद आहे. तो तर आजचा कुवेर आहे. दीर्घ उसासे काय सोडतेस, ओठ काय चावतेस, तोंड काय वेळावतेस ? तर मग माझा अंदाजच खरा ठरला.
 कसा म्हणतेस ? पोरी, सारी रात्र तू दुःखाच्या शेजेवर, नाटकी रतीत संपविलीस ? रात्रभर उजाडण्याची वाट पाहिलीस ? भावहीन क्रीडेची रात्र. बोलण्याची मिठास नाही. ओठांना उत्सुक आमंत्रण नाही. विनोद १८ नाही. उसासे व जांभयांखेरीज खरे काहीच नाही. मिठीही कातर निसटती आणि अनुराग तर पुसटही नाही. हे सारे उघडच दिसत नाही का?
 वाईट नको वाटू देऊस. रूपाचे काय घेऊन बसलीस ? आपण दिसलेल्या रूपाचे कौतुक करावे हेच शास्त्र आहे. काय म्हणतेस ? माझेही विचार काकूसारखेच आहेत ? अग, तसे नाही. हे सांगण्याचे कारण आहे. आता तू जा. मी तुझ्या घरी येईन, तेव्हा शास्त्र नीट समजावून देईन. अरे, प्रणाम न करता गेली. उद्विग्न. विचारी अजून कच्ची आहे. चला, आपणही चलू. (परिक्रमा)
 अरे, ही संन्यासिनी विलासकौण्डिनी. नखऱ्याने ठुमकत येत आहे. हिचे अपरूप लावण्य म्हणजे डोळ्यांना अमृतच. पागल भुंगे मोहरलेले १९ आंवे सोडून हिच्या सुवासिक पदराभोवती गुंजारव करीत आहेत. थोडे हिच्याशी बोलून कान व डोळ्यांचे पारणे फेडू.
 ' देवी भगवती, मी वैशिकाचल आपणास प्रणाम करतो. काय म्हणता ? मला वैशिकाचल नको, वैशेषिकाचलाची २° गरज आहे ? तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
 विशाल व चंचल डोळे भिरभिरत आहेत. रतिश्रमाने गाल ग्लान व तांबूस दिसत आहेत. चालीत आळस, ओठावर मुरका. हे सुभगे, तुझ्या प्रियकराने रति हाच नित्यपदार्थ२१ असल्याचा धडा विवरणपूर्वक शिकविलेला दिसतो.
 काय म्हणता ? " पापी कामदासा, तुला जग तुझ्यासारखे दिसत आहे ?" छे! छे! सुभगे, धन्य आहेत ते दास, ज्यांना तुझ्या चरणसेवेचे भाग्य मिळाले. वरतनू, ते भाग्य आमच्यासारख्या पाप्यांना कसे मिळणार ?

 काय म्हणता ? घट २२ पदार्थाचे ज्ञान नसणाऱ्याशी संभाषण करण्यास गुरुजींची मनाई आहे १ भगवती, आज्ञा तर योग्य आहे. पण जागा चुकली. कारण हे विशालाक्षी,

नाट्यछटेच्या निमित्ताने १५१