या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असत. आपण प्रमाच्या भुकेल्या पण आई मोठी लोभी. तिची आज्ञा तर पाळणे भाग असा अभिनय गणिका करीत. मराठी लोकभाषेत काकू.
 १६. झुलवा-व्यवसायातील गणिका.
 १७. आवडते हेच धनवान असले की व्यवहाराचा रस्ता मोकळा झाला.
 १८. म्हणजे मनोरंजन नाही. हसणे म्हणजे विनोद नव्हे.
 १९. गणिका हा ध्वनी.
 २०. मला गणिकावस्तीत स्थिर असणारा नको; कणादमुनीच्या वैशेषिक शास्त्राचा ज्ञाता हवा. कारण मी कणादानुयायी आहे असा अर्थ.
 २१. कणाद नित्यपदार्थवादी तत्त्वज्ञ आहे.
 २२. द्रव्य, गुण, कर्म, समवाय, भेद, विशेष हे पदार्थ कणाद मानतात. ते मोक्षवादी व योगशास्त्राचे उपासक आहेत.
 २३. बाईला रजोगुण (विटाळ ) असतो. तिला लेप होतो. पुरुषाला काय ? फक्त शेत जाणणारा तो असतो असा फटकारा.
 २४. गमन शब्द द्वयर्थी आहे.
 २५. विटाळ गेलेली. लोकभाषेतील शब्द.
 २६. गुलाल भरणे-धंद्याला लावणे. लोकभाषा.
 २७. त्याग करणे-लोकभाषेतील शब्द.
 २८. पत्नी ही गल्लीबोळ, गणिका हा राजमार्ग. त्या रस्त्यावर जाणाऱ्यांशी भांडणारी.
 २९. लुबाडला गेल्यामुळे भिकारी झाला.
 ३०. मूळ शब्द 'पणित' असा आहे. अगाऊ रक्कम हा अर्थ.
 ३१. ह्या साऱ्यांचा तपशील भरतनाट्यशास्त्रात आहे.
 ३२. निषाद आणि षड्ज ह्यांमधील स्वर.
 ३३. चाकर गणिकेला आज्जुका म्हणत.

प्रतिष्ठान, ऑगस्ट १९७१

धरती, दिवाळी अंक १९७१

नाट्यछटेच्या निमित्ताने १५७