या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशक्य आहे.
 ललित वाङ्मयामध्ये घटना या केवळ घटना नसतात. प्रत्येक घटनेमागे संदर्भ उभे असतात. हे जर आपण मान्य केले, तर जीवनात समर्थनीय काय आहे, इष्ट काय आहे, जे अनिष्ट आहे त्याविरुद्ध मी कसा वागेन, जे इष्ट आहे त्याच्या समर्थनार्थ मी कसा वागेन, यांबाबत विचार करणारा कलावंत आपल्या भूमिकेतून जेव्हा घटनांचा अन्वय लाव लागतो, त्यावेळी जीवनवादी भूमिकेचा उदय होतो. जोपर्यंत कलावंत आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून अभिव्यक्ती करीत असतो, तोपर्यंत त्याला काही आवडण्याजोगे, काही न आवडण्याजोगे राहीलच. कलावंत कशालातरी अनुकूल आणि कशालातरी प्रतिकल राहतीलच. अनुकूल-प्रतिकूलतेशिवाय जीवनाकडे पाहताना भावनेची पातळीच लक्षात घेता येणे शक्य नाही. आपण फारतर एवढे म्हणू की, जे तुम्हांला इष्ट वाटते ते आम्हांला इष्ट वाटत नाही, जे तुम्हांला अनिष्ट वाटते ते आम्हांला अनिष्ट वाटत नाही. पण जोपर्यंत जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोण माणूस जतन करू इच्छितो, जोपर्यंत त्याला स्वतःच्या आवडी-निवडी आणि मते आहेत, तोपर्यंत वाङ्मयसमीक्षेत जीवनवादी भूमिका राहते जे स्वतःला जीवनवादी समजत नाहीत, त्यांचे हे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोण वाङमया प्रतिबिंबित होतातच. आपण ज्या पद्धतीने अनुभव घेतो, ज्या संदर्भात ते व्यक्त करतो दृष्टिकोणाचे दायित्व स्वीकारण्याची तयारी नसली म्हणजे माणसे कलांचे एक स्वतंत्र - आहे असे आग्रहाने सांगू लागतात.
 कलांचे एक स्वतंत्र जग आहे, त्या जगात कलावंत हा सर्वस्वी स्वतंत्र आहे. तर सांगणारी माणसे लौकिक जीवनव्यवहारात आपले हक्क व अधिकार यांना असतातच. लौकिक जीवनातील हक्क अबाधित राहावेत, पण कर्तव्याची जबाबदारी नसावी; अलौकिक जीवनाच्या नावे सर्व कर्तव्याची जबाबदारी टाळता आली पार अशी मनाची घडण होण्याला एक कारण असते. माणूस ज्यावेळी ' स्वातंत्र्य ' या श अर्थ सर्वांचे स्वातंत्र्य असा न करता 'आपले एकट्याचे स्वातंत्र्य ' असा करतो. ही प्रवृत्ती साकार होऊन जाते. जगातील बलवान राष्ट्रांनी दुबळ्या राष्ट्रांना गलाम आणि त्याविरुद्ध हाकाटी होताच आपल्या इच्छास्वातंत्र्याला व कृतिस्वातंत्र्यालाच आहे असा प्रतिवाद करावा, ही गोष्ट आपण समर्थनीय मानू शकतो काय ? स्वा सर्वोच्या स्वातंत्र्याला अविरोधी असते की ज्याचे-त्याचे स्वातंत्र्य इतर सर्वांच्या स्वात निरपेक्ष असते, या प्रश्नाच्या उत्तरावर इतर अनेक प्रश्नांची उत्तरे अवलंबन , आपण कृपा करून हे लक्षात घ्या की, मी कलावंताच्या कलाकृतीवर बंधने घाल समाजाचा हक्क सांगत नाही आहे. मी कलावंताच्या स्वातंत्र्याची इष्टता व आ गृहीत धरून स्वातंत्र्य या कल्पनेच्या दोन बाजूंच्याकडे आपले लक्ष वेधत आहे.

 आजचे सर्व वाङ्मय पुन्हा एकदा जीवनवादी भूमिकेच्याजवळ जात आहे. आज असे सांगतो की, यंत्रांच्या योगाने समाजच यांत्रिक बनलेला असल्यामुळे या, जीवनाचे प्रतिबिंब जर ललित वाङ्मयात पडत असेल, तर त्यात आश्चर्य नाही.

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १७७
पा....१२