असत त्यांस तर सोनें शेरावारी द्यावें लागे! जेथें सोन नसेल तेथे प्रत्येकानें अमुक गठ्ठे कापूस दिलाच पाहिजे असा दंडक होता. ज्यांनी हे कर भरले असतील त्यांच्या गळ्यांत खूण म्हणून एक तांब्याची खापरखुंटी अडकवीत असत. अशा प्रकारें प्रथम देवदूतासारखे दिसणारे हे परके लोक सैतान आहेत हे त्या नेटिवांस कळून चुकलें. कोलंबसाने ठिकठिकाणी किल्ले बांधून तेथे सोनें गोळा करण्याचीं मकाणें केलीं. कोणी जरा हूं कीं चूं केलें, कीं किल्ल्यावरील शिबंदीचे लोक त्यास चाबकाखाली मारीत असत. एक गोष्ट मात्र सांगावयास हवी. जेव्हां जेव्हां त्यानें गुलामांचें भरताड भरून घरीं पाठविलें तेव्हां तेव्हां इझाबेला राणीस परम दुःख होई. तिला संताप येई आणि "या लोकांस परत आपल्या घरादारांत नेऊन सोडा" असा हुकूम ती सोडी. पण एकटीचें कांहींच चाललें नाहीं. पुढें कोलंबसाचीही ग्रहदशा फिरली. शेंकडों दर्यावर्दी तसल्या सफरी करून संपत्ति आणूं लागल्यामुळे त्याची मातब्बरी कोणास वाटेनाशी झाली. राजाराणी थकत चालली. बरोबरच्या लोकांस कोलंबस इतका धाकांत ठेवी कीं, ते शेवटी बंड करून उठत. त्यांनीं अमेरिकेत त्याजविरुद्ध अनेक कारस्थानें रचिलीं; व दरबारांत सारख्या कागाळ्या येऊं लागल्या. शेवटी त्या खऱ्या आहेत असें वाटून राजाराणीनें त्यास बडतर्फ करून परत बोलविलें. त्याच्या जागीं आलेल्या अम्मलदारानें त्यास एकाद्या साध्या कैद्याप्रमाणें वागविलें. त्याच्या हातांत दंडाबेडी घालून त्यास स्वदेशास परत धाडिलें. त्याजवर आरोप असे होते, कीं तद्देशीयांस ख्रिस्ती केलें असतां गुलाम म्हणून विकतां यावयाचे नाहीं म्हणून मिशनऱ्यांच्या कामास हा प्रतिबंध करतो; व परिचयाच्या किनाऱ्यावर जें खंडोगणती मोतीं सांपडलें तें हा आपल्यासाठीं दाबून ठेवतो. चोरट्या बदमाषाप्रमाणें जरी त्याची रवानगी घराकडे करण्यांत आली तरी त्याचें पूर्ववृत्त स्मरून राणीनें गय केली, पण तीही पुढें लवकरच
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१४२