सांपडला व पुढें तेराचवदा वर्षे अहोरात्र दगदग करावी लागल्यामुळे आपलें शरीर आपल्या हातीं राहात नाहीं असें त्यास दिसूं लागलें. तो कित्येकदां म्हणे, "माझी शेतवाडी सोडून या राजकारणाच्या जंजाळांत मी कशाला येऊन पडलों कोणास माहीत." या काळांत प्रपंचांत लक्ष घालावयाससुद्धां त्याला वेळ सांपडत नसे. आपण दिवसेंदिवस थकत चाललों हें त्याला दिसून आलें; त्यांतच त्याला उद्विग्नता आणणारी एक गोष्ट घडून आली. त्याला मुलेबाळें पुष्कळ होती; पण त्यांतील एका मुलीवर त्याचें निरतिशय प्रेम असे. तीच एकदम मृत्यु पावली. त्या दुःखानें क्रॉम्वेल झपाटयानें खचू लागला.
क्रॉम्वेल यानें जो राजसत्तेचा उच्छेद केला त्यावरून इंग्लंड राष्ट्राला इतकेंच ज्ञान झालें कीं, देशांत लोकसत्तात्मक राज्य स्थापन व्हावयास हवें; निदान राजसत्ता इतकीं संकुचित व्हावयास हवी कीं, आपला कारभार आपणच पहात आहों ही जाणीव लोकांना प्राप्त व्हावी. हीच काय ती त्याची कामगिरी होय. त्यानें स्थापन केलेली घटना त्याच्याबरोबरच मरून गेली आणि त्यानें फांसावर चढविलेला राजा जरी पुन्हा परत आला नाहीं तरी राजसत्ता मात्र परत आलीच आली. इतकें खरें कीं, त्यानें दिलेल्या या तडाख्याचा वण राजसत्तेच्या अंगावर कायमचा राहिला. राजसत्ता परत आली इतकेंच नव्हे तर क्रॉम्वेलनें जें कांहीं घडवून आणलें होतें त्यामुळे चिडून गेलेले कांहीं कांहीं लोक पुन्हा अधिकाराच्या जागीं येतांच, तो जिवंत नव्हता म्हणून, त्यांनीं त्याच्या प्रेतावरच सूड उगविला. ज्या तारखेस त्यानें चार्लस राजास वधस्तंभाकडे धाडिलें
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१६८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१६४