पाय घेऊं लागला. अशा वेळीं या चरित्राचा नायक जो सोबेस्की तो त्वरेनें पुढें झाला आणि पोलिश लोकांच्या देशाभिमानास हांक देऊन त्यानें त्या पळपुट्यांस परत वळविलें. जी गोष्ट राजाच्या तपानेंसुद्धां साधली नाहीं ती ह्या जहागिरदाराच्या नवीन मुलानें घडवून आणली यामुळे लोकांस मोठा अचंबा वाटला. राजाने त्यास एकदम एका प्रांताचा सुभेदार नेमिलें. येथून सोबेस्की हा पोलिश लोकांच्या डोळ्यांपुढे नवा राष्ट्रवीर म्हणून नांदू लागला. दरम्यान पोलंड देशांत अनेक उलथापालथी झाल्या. इ० सन १६७० सालीं कोसॅक लोकांनी पोलंडवर पुन्हा एकदां स्वारी केली. या वेळी थोडेसे जर्मन शिपाई फौजखात्यांत होते. त्यांच्या अंगावर कुडतींसुद्धां चांगली नव्हती. आणि इतर हत्यारें म्हणजे नुसती खळपाटणीं होतीं. त्यांचा पगार तर कित्येक वर्षे थकला होता; पण असलेच हे लोक हाताशी घेऊन सोबेस्कीनें कोसॅकांची स्वारी मारून काढिली व त्यांस नीस्टर नदीपलीकडे पिटाळून दिलें.
दरम्यान तिकडे तुर्कांनीं पोलंडवर स्वारी करण्याचा मांड मांडिला होता. तयाऱ्या होतांच त्यांच्या शिपायांचें पेंव पोलंडवर फुटलें. या प्रसंगींसुद्धां देशाच्या संरक्षणाचें काम सोबेस्कीनें आपल्याच शिरावर घेतलें. त्याचा पराक्रम व काम करण्याची हातोटी ही राजास पहावेना. तो त्याचा मत्सर करूं लागला. फौजेस लागणारा दाणागोणा आणि गवतकाडी तो त्यास मिळू देईना. पण राजाचा हा मूर्खपणा ओळखून सोबेस्कीनें पदरमोड करून तयारी चालविली. तुर्कांचें बळ फार, 'घे घे मार' करीत त्यांच्या फौजा देशांत शिरल्या. व लोकांस वाटूं लागलें कीं, हे उंडारलेले तुरुक लवकरच राजधानी गांठणार. त्या तुर्की फौजांचे तांडेच्या तांडे चोहोंकडे शिरतांना पाहतांच लोकांचे डोळे उघडले व हजारों लोक सोबेस्कीच्या नांवाचा जयघोष करीत त्याच्या निशाणाखालीं जमा झाले. पण हें सगळें झालें तरी बंधारे
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७१
जॉन सोबेस्की