आधीच फुटले होते आणि म्हणून तुर्कांचा जमाव सोबेस्कीच्या नवशिक्यांना आवरेना. राजानें तहाचें बोलणें लाविलें व भल्या मोठ्या खंडणीचा गोळा तुर्कांच्या पदरांत टाकून त्यानें त्यांस माघारी लाविलें. पण इस्तंबूलचा सुलतान बडा महत्त्वाकांक्षी तुर्कांच्या राज्याची हद्द बाल्टिक समुद्रांत जाऊन भिजली पाहिजे अशी त्याने उमेद धरिली होती. म्हणून पुढील वर्षी बादशहा चवथा महंमद याने सेनापतिपण पत्करून फौजा बाहेर काढल्या. नीस्टर नदीवर त्यानें भराभर कित्येक पूल तयार केले. पुन्हा सोबेस्कीस पुढें व्हावें लागलें. हालचालीस तोंड लागलें तें ऐन पावसाळ्यांत. पुढें लगोलग हिंवाळ्याचें बर्फ पडूं लागलें. सोबेस्कीच्या शिपायांस हा थंडीचा कडाका अतिशय बाधला. वास्तविक पहातां सरकारांतून या फौजांची सर्व तयारी व्हावयास हवी होती; पण राजा मत्सरी बनला होता, तो कांहींच करीना. शेवटी आपल्याच देशांत लुटालूट करून फौजांना हव्या त्या गोष्टी सोबेस्कीनें ओरबाडून आणल्या. तुर्कांनीं कामिनी नांवाचा किल्ला हस्तगत केला. जवळ फौज नसल्यामुळें तो सोडविण्याचा प्रयत्न सोबेस्कीस करता येईना. म्हणून भर मैदानांत तुर्कांशीं गांठ घालावी असा त्यानें निश्चय केला. शेवटीं कोशीम नांवाच्या किल्ल्याखाली नीस्टर नदीच्या उजव्या तीरावर उभयतांची गांठ पडली. तुर्कांची तयारी दांडगी होती. तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यांनी मोठमोठाले खंदकसुद्धां खणले. सोबेस्कीनें बाजूबाजूनें हल्ला करण्याचा अनेक ठिकाणी देखावा केला; अशासाठीं कीं, तुरुक बोटचेंपा कोठें आहे हे कळावें. तुर्कांना असल्या थंडीची संवय नव्हती. अर्थात् ते थोडे गाफीलच राहिले होते. संधि साधून सोबेस्कीनें एकाएकी असा नेटाचा हल्ला चढविला कीं, तुर्कांची फळी एकदम फुटली. त्यांच्या तळाभोंवतीं कोठें कोठें मोठे कडे होते. सोबेस्कीचे कांहीं घोडेस्वार शिड्या लावून वर चढले. हा अचानक छापाही तुर्कांना नीट अजमावतां येईना. फौजांतले नोकर-
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१७६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१७२