देतो व लूट पैदा करितो'. प्रिये मेरी, मला मात्र तूं असें खास म्हणणार नाहींस.
"हे तुरुक म्हणजे घमेंडखोर आणि चढेल. त्यांना वाटलें डाव स्वस्तांत पडेल. म्हणून निम्या फौजेनें आमच्याशीं मारामारी सुरू केली आणि निम्मीनें राजधानीवर घाला घातला. त्याचें माणूसबळ फार मोठें! करोल तीन लाख शिपाई वजिरापाशीं होता. मदतीस घेतलेल्या तार्तरांच्या फौजा निराळ्या. नुसते तंबू मोजले तर थोडे कमी एक लक्ष भरले ! दोन दिवस झाले, अहोरात्र लूट चालली आहे. ज्यास जें आवडेल तें तो उचलीत आहे. राजधानींतले गांवकरीसुद्धां हात मारून घेत आहेत. आणखी पांच सात दिवस लुटीचें काम ह्या लोकांना सहज पुरेल. तुर्कांनीं शेंकडों कैदी मागें टाकले. त्यांत बायका फार होत्या; पण जितक्या मारतां आल्या तितक्या त्यांनीं मारिल्या. हे कैदी आणि बायका कोठल्या म्हणशील तर या देशांत तळ दिल्यापासून त्यांनीं भोंवतालच्या जमा केलेल्या. वजिरापाशीं एक सुंदर शहामृग होता; पण पळून जावयाच्या आधीं आम्हां ख्रिस्त्यांच्या हातीं तो पडूं नये म्हणून त्यानें त्याची मान उडविली. वजिराच्या तंबूंत सुखोपभोगाचीं विविध साधनें काय मनमुराद जमविलीं होतीं तें सांगतां पुरवत नाहीं. जलविहारासाठीं लहान लहान तडाग केले होते. जिकडे तिकडे बगिचे पसरले असून त्यांत शेंकडों कारंजी थुइथुइ करीत होतीं. एक राघूसुद्धां मोठा गमतीचा होता. पण तो आम्हांस गवसला नाहीं. आज मी शहरांत गेलों होतों. तेथील स्थिति पाहून मला वाटलें, तुरुक जर पळाला नसता तर चार पांच दिवसांहून जास्त दम धरतां येता ना. राजाच्या वाड्याला गोळ्यांनीं भगदाडें पाडिलीं आहेत आणि ते प्रचंड बुरूज फाटून जाऊन कोसळावयास ठेपले आहेत. वजिराला जेव्हां दिसलें कीं, आपली आतां धडगत नाहीं तेव्हां त्यानें आपल्या सर्व
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१८०