पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पु रु ष श्रे ष्ठ




 शिकंदर

सवी सनापूर्वी ३५६ व्या वर्षी मॅसिडोनियातील पेला नावाच्या राजधानीच्या शहरीं शिकंदर याचा जन्म झाला. एकीकडून हर्क्यूलस व दुसरीकडून ऍकिला अशा शूर पुराणपुरुषांच्या कुळांत शिकंदर निपजला! खुद्द त्याचा बाप जो फिलिप तोही मोठा मसलती, साहसी व महत्त्वाकांक्षी असे. त्याचें राज्य म्हणजे डोंगरकठडीचा एक लहानसा टापू होता. पण फिलिपनें त्याचें मोठें राष्ट्र बनविलें. वास्तविक पाहातां फिलिपनें तें पहिलें लहानसें राज्यसुद्धां बळकाविलेलेंच होतें. पण तो येवढ्यावर थांबला नाहीं. कवाइती फौजेचें बळ काय असतें हें त्यानें ओळखलें होतें. आणि म्हणून हजारों जवान त्यानें आपल्या फौजेंत दाखल करून त्यांस कवाइत शिकवून भोवतालच्या लोकांच्या मुलुखांत पुंडावा मांडिला. होतां होतां त्याचें बळ इतकें वाढलें कीं, त्या लहान लहान ग्रीक संस्थानांनी त्याला मोठेपण देऊन आपल्या तोलाचा म्हणून कबूल केलें. दरम्यान उपस्थित झालेल्या शत्रूंवर धाडावयास हाच योग्य आहे असें पाहून त्यांनी त्याचीच योजना केली. त्यानेही होय म्हणून आपला उपयोग होऊं दिला. कारण त्यालाही आपले महत्त्व वाढवावयास हवेंच होते. त्याचें प्रस्थ माजूं देऊं नये म्हणून थीब्ज व अथेन्स येथील लोकांनी त्याच्याशी