येशू ख्रिस्त
जोइसवी सन सध्यां चालू आहे तो येशूच्या जन्मापासूनच धरलेला असल्यामुळे येशू केव्हां जन्मला हें निराळें सांगावयास नको. पॅलिस्तान प्रांतांतील गॅलिली परगण्यांत नाझारेथ येथें या थोर धर्मसंस्थापकाचा जन्म झाला. कोणी म्हणतात कीं, नाझारेथच्या नजीक असलेल्या बेथलेम गांवीं तो जन्मला. रोमन शकाच्या ७५० साली ऑगस्टस यानें आपल्या साम्राज्याची खानेसुमारी करविली. तेव्हां हुकुमाप्रमाणे सर्व लोकांना नांवनिशी द्यावयास ठाण्यावर जाणें प्राप्त होते. येशूचा बाप जोसेफ हाही आपल्या बायकोस घेऊन बेथलेम ठाण्यावर गेला होता. मेरी गरोदर होती. दिवस भरले होते, पण ठाण्यावर जाणें प्राप्त होतें. तेथे मुक्काम असतांच मेरी प्रसूत झाली. धर्मशाळेंत बाळंतिणीची व्यवस्था नीटशी लागेना. शेवटी मेरीनें मूल बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत निजविलें. पलीकडील रानांत मेंढपाळ आपलीं मेंढरें राखीत होते. एकाएकीं परमेश्वराचा दूत त्यांपुढें प्रगट झाला व म्हणाला, 'मी तुम्हांला शुभवर्तमान सांगावयास आलों आहें. तुम्हांस तारणारा आज जन्मला आहे. गांवांत जा आणि पहा. बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत निजविलेलें जें बालक तुम्हांस दिसेल, तेंच तुमचा तारक होय'. धनगर भयानें व आश्चर्यानें चकित झाले ! कारण, हा दूत परम दैदीप्यमान होता व त्यानें सांगितलेली वार्ता त्यांना अभावितच होती. दूत अंतर्धान पावला व धनगर लगबगीनें बेथलेमकडे निघाले. येऊन पहातात तों गव्हाणीत एक गोजिरवाणें अर्भक निजविलेले दिसलें. असें असें वर्तमान आपणांस देवदूतानें येऊन सांगितलें, इत्यादि गोष्टी त्यांनी इतरांस सांगितल्या. सर्व लोक बालकाचें दर्शन घेऊन आश्चय