पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रूपा ॥ २ ॥ निःसंगा अमळा दयाळा कोमळा | आद्यंती सकळा तूंचि त्राता || ३ || तुका म्हणे तुझी अघटीत लीळा । व्यासादि सकळां न वर्णवे ॥ ४ ॥ ध्यान व प्रार्थना. पद. -- बागेसरी. - प्रीति लागो तुझीये दृढतर पायें || धृ० ॥ प्रभो तुवां जननी ॥ पित्यापरी पाळितां कृतन्न मी विसरें || प्रीति ० ॥ १ ॥ उपदेश. अभंग, आतां तुज कळेल तें करौं । तारिसी तरी तारीं मारी। जवळी अ- यवा दुरी घरीं । घालीं संसारी अथवा नको ॥ १ ॥ शरण आलों नेणतपणे | भाव आणि भक्ति कांहींच नेणे । मतिमंद सर्वज्ञानें | बहु रंक उणें रंकाहुनी ॥ २ ॥ मन स्थिर नाहीं माझिये हाती । इंद्रिये धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ति । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥ ३ ॥ सकळ निवेदिला भाव | तुझिये पाय ठेवि- ला जीव । आतां करी कळे तो उपाव | तूंचि सर्व ठाव माझा