पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) देवा || ४ || राहिलों धरूनी विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझे उचित ॥ ५ ॥ विशेष प्रार्थना. अभंग. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा | अनन्य केशवा दास तुझा ॥ १ ॥ म्हणऊाने करी पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणे परी ॥ २ ॥ एक विध आम्ही स्वामि-सेवेसाठीं । वरी तोचि पोर्टी एक भाव ॥ ३ ॥ तुका ह्मणे करी सांगितले काम । तुम्हां धर्मा- धर्म ठावे देवा ॥ ४ ॥ भजन. अभंग-मालकंस. तुझा म्हणवूनि जाल उतराई । त्याचे वर्म काई ते मी नेणें ॥ ॥ १ ॥ हाती धरोनियां दावी मज वाट | पुढे कोण नीट तेंचि देवा || २ || देवभक्तपण करावें जतन | दोहपक्षी जाण तूचि बळी || ३ || अभिमानें तुज लागली हे लाज | शरणागतां का. न करावया ॥ 8 ॥ तुका म्हणे बहु नेणता मी फार | म्हणऊनि विचार जाणविला ॥ ५ ॥