या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
आरती. जय देव जय देव जय मंगलधामा भावें भजतो तुजला दे सुख विश्रामा || ध्रु० ॥ तव ध्याने आमुचें मन मोहित झाले || म्हणुनी मनमोहन हें नाम तुला दिधलें ॥ तव भजनामृत-प्राशन आवडिने केलें || करुणाकर देवा सार्थक हें गमलें ॥ जय० ॥ १ ॥ देवा केले तुवां अगणित उपकार | सकळ ब्रम्हांडाचा तूंचि आधार || निजभक्तांचा घेशी मायां तूं भार । ऐशी करुणा तूझी देवा अपार ॥ जय० ॥ २ ॥ अर्पू तनुमनधन हे अवघें दृढचित्ते । पातकि आम्ही परि तूं उद्धरिं दासांतें ॥ शिशु हारीं येतां रक्षावें तातें । सां- भाळ धरुनीयां निजभक्तां हातें ॥ जय० ॥ ३ ॥ भावे प्रेमें अनु- दिन करूं तुझी सेवा | आनंदाचा देवा दिन ऐसा यावा | तो त्वां करुणागारे सत्वरि आणावा | हीच प्रार्थना बा तुजपाशीं देवा ॥ जय० ॥ ४ ॥