पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाच्या || २ || सकळ इंद्रियें झाली ब्रम्हरूप ॥ ओतलें स्वरूप माजी तया ॥ ३ ॥ तुका म्हणे जेथें वसे भक्तराव || तेथे नांदे देव संदेह नाहीं ।। ४ ।। आरती. जय देव जय देव जय मंगलकारी जय मंगलकारी । विपदशोक भय- हारी, विपदशोक भयहारी अनन्तगुणधारी ॥ जय० ॥ १ ॥ जय चिन्मय परमात्मन् जय प्रभु अलक्ष निरंजन, जय प्रभु अलक्ष निरंजन | निराकार सर्वोत्तम निराकार सर्वोत्तम | जगपति जगवंदन ॥ जय० ||२|| जय अतुल अमर अमृतमय, जय करुणासिंधू, जय करुणासिंधू । विश्व नाथ प्रतिपालक, विश्वनाथ प्रतिपालक जय दीनबंधू ॥ जय० ॥ ३॥जय मोक्षधाम जगपावन जय पापताप भंजन, जय पापताप भंजन, नित्यसत्य अविनाशी, नित्यसत्य अविनाशी परम भक्तिभाजन ॥ जय० ॥ ४ ॥ जय सदानंद परमात्मन् जय जगतगुरू स्वामी, जय जगतगुरू स्वामी । सद्धर्ममागी निशदिन सद्धर्ममार्गी निशदिन, राखा अनुगामी ॥ जय० ॥ ५॥