पान:पुणें येथील वत्त्कृत्वोत्तेजक मंडळीचा सन १९०५-०६ सालचा रिपोर्ट.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या पोट कमिटीची सभा तारीख १८ माहे नोव्हेंबर सन १९०५ रोजीं भरली होती. त्यावेळीं त्यांनीं खालीं लिहिले प्रमाणें सूचना केल्या.
 नियम ५-( अ ) यांत " मंडळीचा सभासद गणला जाईल " यापुढें " परंतु समारंभ सतत तीन वर्षे चालु नसेल तर हा नियम लागूं पडूं नये. तीन वर्षात जितकी वर्षे समारंभ चालू राहील तितके साली, जो वर्गणी देईल तोही सभासद गणला जाईल. " ( ब ) तीन वर्षे समारंभ बंद असल्यास शेवटले वर्षी जे वर्गणदार असतील ते सभासद गणले जातील.
( क ) कलम ( ब ) यांत लिहिलेलें शक्य नसेल तर ज्या सालचे वर्गणीदार त्या सालचे सभासद गणले जातील.  यणंप्रमाणे कलमें असावीत.
नियम ११ १. “ व्यवस्थापक मंडळींत वीस सभासदं असावेत. " असें आहे. तेथें " व्यवस्थापक मंडळींत पंघरा सभासद असावेत". असें असावें.
 २. व्यवस्थापक मंडळीचें काम चालविण्यास निदान ७ तरी सभासद असावेत " असें आहे तेथें " व्यवस्थापक मंड- ळीचें काम चालविणेंस निदान ५ तरी सभासद असावेत " असें असावें.
नियम १३. भाषण समारंभ झाल्यानंतर किरकोळ खर्चाकरितां १० रुपये खजीनदार यांजपाशीं ठेऊन ' असें आहे त्याचे पुढें ' व १० रुपये चिटणीस यांचे जवळ ठेवून ' असें असावें.

उमेदवारांचे समजूतीसाठीं सूचना.

कलम १. ' भाषणांत विषयाची जुळणी, त्याचें प्रतिपादन व श्रोत्यांचे मनांत उतरून देण्याची शैली' असें लिहिले आहे त्याठिकाणीं ‘ भाषणांत विषयाची जुळणी, विषयाची माहिती व श्रोत्यांचे मनांत उतरून देण्याची शैली,' असें असावें. आणि याप्रमाणें परीक्षेचे गुणाचे पत्रकात सदरें असावीत.