कलम २. 'भाषण करण्यास येऊ इच्छिणारे उमेदवारांनी' यापुढे ' धार्मिक विषयावर बोलणारांनी दोन शास्त्र्यांचे सहीचे व बाकीचे विष-यांवर बोलणारांनी दोन ग्रॅजएटचे सहीचे अशीं सर्टिफिकीटें व एक रुपया आपल्या अर्जासोबत पाठवावा ' असें असावें. अर्ज तारीख २५ एप्रिलचे आंत अगर त्यादिवशीं येऊन पोंचतील असे, खालीं सही करणाराकडे पाठवावे.
व्यवस्थापक मंडळीची दुसरो सभा ता० ३० माहे डिसेंबर सन १९०५ इसवी रोजीं भरली होती. त्यावेळी सभेचे नियमांत अवश्य असतील ते फेर- फार सुचविणेंसाठी जी पोट कमेटी नेमली होती त्या पोट कनिटीनें केलेल्या सूचनांबद्दल विचार झाला. त्या सूचनांपैकी उंमदवारांच्या समजूतीसाठी सूचना.
'धार्मिक विषयांवर बोलणारांनी दान शास्त्र्यांचे सहीचे व बाकीचे विषयांवर बोलणारांनी दोन ग्रॅजुएटच्या सहीचे अशीं सर्टिफिकीटें आपले अर्जा बरोबर पाठवावीत' असें आहे ती सूचना नापसंत ठरली व बाकीच्या जाहि-रातींत प्रसिद्ध करण्यांत आल्या. व सभेचे नियमांसबंधी सूचना साधारण सभेपुढे मांडणविषयीं ठराव करण्यांत आला. तसेच समारंभाची तारीख ७ माहे मे सन १९०६ ठरविण्यांत आली. बक्षिसासंबंधीं व एस्टाब्लिशमेंटसंबंधीं खर्चाबद्दल ठराव करण्यांत आले.
तिसरी सभा ता० १८ माहे एप्रील सन १९०६ इसवी रोजी भरली होती. त्यावेळी निरनिराळे विषयांवर निरनिराळे परीक्षक कोणकोणचे नेमणे- विषयीं, जादा कारकून ठेवणे विषयीं, समारंभासंबंधी व्यवस्थापक मंडळी नेमणें- विषयीं व टिकीटांचे दर ठरविणविषय ठराव करण्यांत आले.
५. ठरल्याप्रमाणें ता० १० माहे फेब्रुवारी सन १९०६ रोजी समारंभाची जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरात येथील मुख्य वर्तमानपत्रकर्त्यांनी आपआपले वर्तमानपत्रांत चार्ज न घेतां एकवेळ छापून प्रसिद्ध केली दाणेआळींतील विज-
यानंद नाटकगृह समारंभाकरितां कायम केले व ता० ७ माहे मे सन १९०६ पासून समारंभास सुरुवात झाली. एकंदर चारी विषयांवर २६ उमेदवार आले होते. पाहेल्या विषयावर १०, दुसरे विषयावर ७, तिसरे विषयावर ८ व चवथे
विजयावर १. याप्रमाणें अर्ज आले होते. पैकी पहिले विषयावरील १ व तिसरे विषयावरील १ असं दान उमेदवार खेरीज करून बाकी सर्व उमेदवार भाषणं
पान:पुणें येथील वत्त्कृत्वोत्तेजक मंडळीचा सन १९०५-०६ सालचा रिपोर्ट.pdf/५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४