पान:पुणें येथील वत्त्कृत्वोत्तेजक मंडळीचा सन १९०५-०६ सालचा रिपोर्ट.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यास हजर होते. जे परीक्षक नेमले होते त्यांपैकी ज्यानां हजर राहतां आलें नाही त्यांचे जागीं दूसरे विषयावर रा. रा. बाळकृष्ण नारायण भाजेकर व तिसरे विषयावर स. रा लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांची योजना करावी लागली.आयत्या वेळचा विषय 'आपल्या ह्मणज हिंदुलोकांच्या समाज स्थितीत फरक करावेत असें प्रतिपादन करणारांचा एक वर्ग इंग्रजी शिक्षण सुरू झाच्यापासून निघाला आहे.त्यावगतील लोकांची मतें सांगून त्यांपैकी ग्राह्य कोणती व त्याज्य कोणतीं व कां,यांचें विवेचन करणें' असा ठरविला होता.तो २दिवस अगोदर जाहीर केला होता.
 ६. वर्गणी जमा झाली तीवरून पाहतां सन १९०५ सालचे समारंभा- प्रमाणेंच हा समारंभ चांगल्या प्रकारें झाला असे दिसून येईल.एकंदर वर्गणीदारांचे टिकीटाचें उत्पन्न रुपये १५० व किरकोळ टिकीट विक्रीचें उत्पन्न रुपये ५००१० एकूण २००४१० दोनशें रुपये दहा आणे उत्पन्न झालें.ता० १४ माहे मे सन १९०६ रोजी बक्षीस समारंभ झाला त्यासमयीं ह्या संस्थेचे अध्यक्ष रावबहादूर काशिनाथ बालकृष्ण मराठे व रा. रा. प्रभाकर लक्ष्मण नागपूरकर व रा. रा. लक्षुमण रामचंद्र पांगारकर यांची भाषणें झालीं.एकंदर उमेदवारांपैकी ७ उमेदवार पास झाले. व त्यांस बक्षिसे दिलीं तीं-
  '• विषय पहिला.       विषय तिसरा.
३५ श्रीधर गणेश देवरूखकर.     ३५ त्रिंबक केशव आठवले.
२० नारायण दामोधर सावरकर.     २० नारायणशास्त्री गुंडशास्त्री
  'विषय दुसरा.           वाटेगांवकर.
३५ शंकर गोपाळ लेले.       विषय चवथा.
२० दत्तात्रय परशराम चिंचळकर.    ४० पुरुषोत्तम नारायण दांडेकर.
 ७.समारंभासंबंधीं नाटकगृहामध्यें व्यवस्था ठवणेंकरितां रा. रा. विष्णु नारायण साठे व रा.रा. दिनकर कृष्ण साठे यांणी व त्यांचे स्नेही यांणीं चांगली मदत केली. येथील केसरी, ज्ञानप्रकाश व जगद्धितेच्छु वर्तमानपत्रांचे म्यानेजर यांणीं आपले वर्तमानपत्रांत समारंभासंबंधाची जाहिरात एकवेळ फुकट छापून प्रसिद्ध करण्याची मदत केली. शिवाय कमिटीचे सभासद व निरानेराळे विषयांवरील परीक्षक यांणीं मेहरबानीनें समारंभास जो हातभार लाविला त्या-बद्दल ह्या सर्वांचे मंडळीतर्फे आभार मानिले पाहिजेत.