या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आभाळा रे आभाळा आभाळा रे आभाळा रंग तुझा रे निळा सावळा क्षणा क्षणाला बदलत जासी हेवा वाटे खरेंच मजसी लूट करिसि तूं कपड्य नसे काळजी पैशाची महतेचा गंध नसे तुज चिंतेचा का पत्ता माहित ? युगायुगाची पुण्याई ही समृध्दी अन् औष आरामी रंगित सुंदर वस्त्र नेसुनी विलास करिसी तारा लागुनी मानव आम्ही चिंतातुर रे कष्ट आमुचे पाठीराखे प्रसाद दे तर तव जादूचा सौख्य कसें तें पाहुं एकदा गान देवते आस दाटली बाल्या पासुनि विनित असावे तुझ्या पूजनी तव चरणाची धूळ पडावी संगित सेवा मला घडावी ध्येय सुमंगल गान साधना तुझ्या कृपेची मनी कामना मधुर सुरांच्या सुंदर लहरी हसवित राही हृदय अंतरी वीणेचा स्वर छेडित छेडित भक्ति-रसाचे अमृत सांडित परब्रम्ह तें जवळी आणिन ब्रम्हानंदे जगास रमविन मीलन करुनी सप्त सुरांचे रागरागिणित आलापांचे आर्त सुरांनी गीते आळविन पीडीतांची दुःखे शमविन संसारी मी आहे अबला काम, धाम, घर घेरित मजला चिंतन करण्या तुझें देवते कसे जमावें ? मन बावरतें गीतानें ही खुलती बाळें सरून चिंता डुलतिल सगळे जरी न हो तूं प्रसन्न मजसी अशीच पूजिन जन्मोजन्मी '

  • (५९)