या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सवाल माझा अगदी साधा | कोकिळ गवई शिकवी गायन सप्त सुरांतील सुंदर तान कशास तुम्ही भरतां शाळा सवाल माझा अगदी साधा पोपट राजे महान वक्ते धडे तयांचे वक्तृत्वाचे कशास तुमची वटवट आतां सवाल माझा अगदी साधा मयूर पहा हा दंग नर्तनी पसरि पिसारा थयथय नाचुनि कशास दमतां नृत्य कथ्थका सवाल माझा अगदी साधा आळस झाडुनि उठा लौकरी कुकूच काका नित्य पुकारी कशास भुणभुण आपुली सांगा सवाल माझा अगदी साधा सान कष्टते मधमाशी ही विश्रांती ती कधी न घेई श्रमदानाची कशास गाथा सवाल माझा अगदी साधा मैफल गान कोकिळा गावयास बैसे रसिक श्रोत्यांची रांग लागलीसे "कसा तंबोरा धरू, " म्हणे बाई "हात तारांना मुळिच पुरत नाही" ! सूर पेटीचा मोर धरू लागे चोंच भात्याला सारितसे मागे थाप तबल्यावर बुवा सुतारांची ठोक ठोकोनी झुंज बदसुरांची रंग मैफलिचा भरत वना माजीं डुलत श्रोते अन् खुलत तान बाजी आणि विश्रांती मधे सुरु झाली गीत गाओनीं बाइ फार दमली गळा शेकोनी पुन्हा बसे गाण्या साथवाल्यांना देत हाक येण्या वरी पाही तो कुणी नसे श्रोता सांथ करण्याला कुणाचा न पत्ता आम्रतरुवर बैसली रुसुन बाई कुहु कुहु कुहू घोळवीत राही.

गूढ (६१)