पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें, देवीभागवताचा काळ ! टीकाकार नीळकंठ म्हणतो कीं, कूर्म, गरुड व पद्मपुराणामध्ये महा- पुराणांत एक भागवत असून शिवाय उपपुराणांतही एक भागवत आहे. हेमाद्रीनें दानप्रस्तावांत कूर्मपुराणांतून १८ महापुराणांविषयीं उतारे घेतल्यानंतर उपपुराणांविषयी त्याच पुराणांतून पुढे असा उतारा घेतलेला आहे:- i अन्यान्युपपुराणानि मुनिभिः कथितानि तु । आद्यं सनत्कुमारोक्तं नारसिंहमतः परम् ॥ पराशरोक्तं प्रवरं तथा भागवताद्वयम् । या उताऱ्यावरून हेमाद्रीच्या वेळी दोन भागवतें प्रचलित होती इतकेंच नव्हे, तर त्याच्यापूर्वीही श्रीधराच्या वेळीं ( इ० स० ११०० ) दोन भागवतें होतीं हैं कळून येतें. गरुडपुराण, तत्त्वरहस्य, अंश २, धर्मकांड अ १ मध्ये व तसेंच पद्मपुराण, शकुनपरीक्षा, व भागवतमाहात्म्य १९ वा अध्याय यांत ' दुर्गा भागवत, दौर्गभागवत ", 'देवी भागवत' या नांवांनी देवीभागवताचे उल्लेख आलेले आहेत. 66 37 पुराणं भागवतं दौगे नंदिप्रोक्तं तथैव च । पाशुपत्यं रेणुकं च भैरवं च तथैव च ॥ गारुडे. वाराहं ब्रह्मवैवर्त शकुनेषु प्रशस्यते । शवं भागवतं दौर्गे भविष्योत्तरमेव च ॥ पद्म, शकुनप. शैवमादिपुराणं च देवीभागवतं तथा । पद्म, भागवतमाहात्म्य अ. १० नीळकंठ म्हणतो की, शैव पुराणांत देवीभागवतास महापुराण मानिलें आहे:-