पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण.. , विष्णुभागवतासच उल्लेखून आहेत. | टीकाही नव्हत्या. नीळकंठच म्हणतो, इत्यादि कारणांमुळें विष्णुभागवतच महापुराण होय असें समजण्यास हरकत नाहीं. हैं पुराण अत्यंत मह त्वाचें व प्राचीन आहे. तसें देवी- भागवत नाहीं ! गर्ग व शौनक यांनीं याचाच उल्लेख केलेला आहे. ‘ व्याख्यानरहितस्य च व्याख्यान नाहीं म्हणून आपण व्याख्यान लि- हितों. हैं इतकें श्रेष्ठ असतें तर पूर्वी यांवर व्याख्या कां नाहीं झाल्या? देवीभागवत स्वतःस महापुराण ठरवून उपपुराणांत एक भागवत सांगतें; तेथें नीळकंठ वै. भागव- तच घेतो. यावरूनच देवीभागवत- कारास वै. भागवत माहीत होणें हैं सिद्ध होतें. देवीभागवताचें खरें पहातां उपपुराणांतही नांव नाहीं !!! वरील एकंदर प्रमाणपरंपरेवरून असे दिसून येईल की, वैष्णव लोक विष्णुभागवत व शाक्त लोक देवीभागवत महापुराण मानतात. आमचें मत वैष्णवभागवतच मूळचें महापुराण असें आहे. याविषयीं आणखी कांहीं विचार करूं :-- ८८ विष्णुभा. व देवीभा. या दोहोंची तुलना केली तर असें दिसून येईल कीं, दोहोंची रचना अध्यायसंख्योशवाय बाकी सर्व लक्षणवर्णनांत जुळेल अशी केलेली आहे. यामुळे हा वाद मिटणें कठिण पडलें होतें. मत्स्यपुराणाच्या मतें भागवताचें लक्षण असे आहे:- यत्राधिकृत्य गायत्रीं वर्ण्यते धर्मविस्तरः । वृत्रासुरवधोपेतं तद्भागवतमुच्यते ॥ सारस्वतस्य कल्पस्य मध्ये ये स्युर्नरामराः । तद्वृत्तांतोद्भवं लोके तद्भागवतमुच्यते । अष्टादशसहस्राणि पुराणं तत्प्रकीर्तितम् ।